Oscars 2026- One Battle After Anotherbest picture and Jessie Buckley Oscar for Best Actress  x account
मनोरंजन

98th Oscars winners | ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; Jessie Buckley ने घडवला इतिहास

ऑस्कर्स 2026 | सर्वोत्कृष्ट पिक्चर ठरला One Battle After Another, ऑस्कर जिंकणारी पहिली आयरिश अभिनेत्री ठरली Jessie Buckley

स्वालिया न. शिकलगार

लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यावर्षी दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्या 'One Battle After Another' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण ६ पुरस्कार जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, जेसी बकली हिने 'Hamnet' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून इतिहास घडवला; ती हा पुरस्कार मिळवणारी पहिली आयरिश अभिनेत्री ठरली आहे. तसेच, मायकल बी. जॉर्डन याला 'Sinners' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळाला.

98th Academy Awards winners list : One Battle After Another best picture

सिनेविश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ९८ व्या ऑस्कर (Academy Awards 2026) पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या सोहळ्यात 'One Battle After Another' या चित्रपटाने बाजी मारली. त्याने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (Best Picture) पुरस्कार आपल्या नावे केला. या चित्रपटाने केवळ मुख्य पुरस्कारच नाही, तर दिग्दर्शन, पटकथा आणि संकलनासह एकूण सहा श्रेणींमध्ये विजय मिळवत या वर्षाचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरण्याचा मान मिळवला.

बार रायन कूगलरच्या 'सिनर्स' आणि पॉल थॉमस एंडरसनच्या 'वन बॅटल आफ्टर अनदर' यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. बेस्ट ॲक्टर कॅटेगरीमध्ये मायकल बी. जॉर्डन आणि टिमथी शॅलमे यांच्यात सामान पाहायला मिळाला. 'सिनर्स' १६ नॉमिनेशन्ससह इतिहास रचत ऑस्करमध्ये पोहोचला होता. तर 'वन बॅटल आफ्टर अनादर'ला ११३ नॉमिनेशन मिळाले होते.

पॉल थॉमस अँडरसन यांचे पहिले ऑस्कर

दिग्गज दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्यासाठी ऑस्कर सोहळ्याची रात्र अत्यंत खास ठरली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी 'One Battle After Another' साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावला. राजकीय संघर्ष आणि मानवी नात्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली आहेत.

मायकल बी. जॉर्डन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

'Sinners' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी मायकल बी. जॉर्डनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या शर्यतीत टिमोथी शालामे आणि लिओनार्दो डिकॅप्रिओ सारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकले. 'Sinners' या चित्रपटाला सर्वाधिक १६ नामांकने मिळाली होती, ज्यापैकी या चित्रपटाने ४ पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

who is Jessie Buckley - बेस्ट एक्ट्रेस- जेसिका बकली

क्लोई जाओ दिग्दर्शित 'हॅमनेट'मध्ये उत्तम अभिनयासाठी पुरस्कार आयरिश अभिनेत्री जेसिका बकलीला मिळाला. पहिल्यांदाचा एखाद्या आयरिश अभिनेत्रीला ऑस्कर मि‍ळाला आहे. तिने हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केला. ती म्हणाली, ''आज यू.के. मध्ये मदर्स डे आहे आणि मी हा पुरस्कार आईच्या हृदयातील सुंदर आणि गुंतागुंतीच्या भावनांना समर्पित करू इच्छिते.'' पुरस्कार घताना ती खूप भावूक झाली.

विजेत्यांची यादी -

बेस्ट पिक्चर- वन बॅटल आफ्टर एनदर

बेस्ट ॲक्टर- मायकल बी जॉर्डन (सिनर्स)

बेस्ट डायरेक्टर- पॉल थॉमस एंडरसन (वन बॅटल आफ्टर अनादर)

बेस्ट सॉन्ग- गोल्डन (के-पॉप डेमन हंटर्स)

'वन बैटल आफ्टर एनदर' के नाम 4 ऑस्कर

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म- सेंटिमेंटल व्हॅल्यू

बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले

बेस्ट सिनेमॅटोग्राफी- ऑटम डुरल्ड आर्कापॉ

बेस्ट फिल्म एडिटिंग- एंडी जर्गेनसन

बेस्ट ॲनिमेटेड फीचर- के-पॉप डेमन हंटर्स

बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म- The Girl Who Cried Pearls

बेस्ट साउंड- F1

बेस्ट ऑरिजिनल स्कोर- सिनर्स

बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन- फ्रॅकेंस्टीन

बेस्ट मेकअप अँड हेअरस्टाईलिंग- फ्रँकेंस्टीन

बेस्ट कास्टिंग - कसांद्रा कुलुकुंडिस (Cassandra Kulukundis-'वन बैटल आफ्टर एनदर')

यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध टीव्ही होस्ट कोनन ओब्रायन यांनी केले. या सोहळ्यात देसी गर्ल, हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनास हिने देखील सादरीकरण करत उपस्थिती दर्शवली. प्रियांका चोप्रा शोच्या प्रेजेंटर्स पैकी एक ठरली. ती पती निक जोनास सोबत रेड कार्पेटवर उतरली. व्हाईट स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ती स्टनिंग दिसली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT