Bollywood News : 'लग्नाआधी लिव-इनमध्ये राहणे गरजेचे', 74 वर्षीय जीनत अमान यांचे मत; म्हणाल्या.. file photo
मनोरंजन

Bollywood News : 'लग्नाआधी लिव-इनमध्ये राहणे गरजेचे', 74 वर्षीय झीनत अमान स्पष्टच बोलल्या..

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री झीनत अमान आपल्या काळातील ग्लॅमरस आणि धाडसी अभिनेत्रींपैकी एक होत्या.

पुढारी वृत्तसेवा

74 years old zeenat aman advised live in relationship before marriage says dont want 15 miserable years

पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान या 74 वर्षांच्या असल्या तरी त्यांची विचारसरणी आजच्या काळाशी सुसंगत आहे. त्यांचे मत आहे की लग्नापूर्वी जोडीदारासोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याने एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री झीनत अमान आपल्या काळातील ग्लॅमरस आणि धाडसी अभिनेत्रींपैकी एक होत्या. आजही त्या स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लग्नाआधी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला.

लिव-इन रिलेशनशिपबाबत जीनत अमान यांचे मत

झीनत अमान या नातेसंबंधांबाबत आपली मते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे म्हणणे आहे की आजच्या काळात लग्नापूर्वी लिव-इनमध्ये राहणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. यामुळे दोघांमधील जुळवून घेण्याची क्षमता (कम्पॅटिबिलिटी) समजून घेण्यास मदत होते. यापूर्वीही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता.

यूट्यूबवरील 'फ्लिप द स्क्रिप्ट विद शुभ्रा' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले, "आजच्या काळातच नव्हे तर पूर्वीही कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. त्यामुळे कायदेशीररित्या विवाहबंधनात अडकण्यापूर्वी तुमची कम्पॅटिबिलिटी तपासणे गरजेचे आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांसाठी योग्य आहात की नाही, हे जाणून घेणे आवश्यक आहे. भविष्यात मुलं होण्याचा विचार असेल, तर त्यांचे संगोपन कसे कराल? पैशांबाबत दोघांची विचारसरणी काय आहे? जर दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नसेल, तर अशा नात्याचा उपयोग काय? 15 वर्षे अडचणींनी भरलेले आयुष्य जगण्यापेक्षा 5 वर्षे आनंदाने जगणे अधिक चांगले नाही का? माझे तरी असेच मत आहे."

नात्यावर सातत्याने काम करणे का आवश्यक?

झीनत अमान यांच्या मते, कोणतेही नाते टिकवण्यासाठी परस्पर आदर अत्यंत महत्त्वाचा आहे. दोघांनीही नात्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, कारण काळानुसार नातेसंबंध बदलत असतात.

त्या म्हणाल्या, "नात्यावर कायम काम करत राहावे लागते. हनिमून फेज कायम राहील, अशी अपेक्षा ठेवू नये. नाते टिकवायचे असेल तर तडजोड आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे. काळानुसार एकमेकांविषयीची ओढही बदलते. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या रोमँसवर अवलंबून न राहता, नाते टिकवण्यासाठी परस्पर बांधिलकी (कमिटमेंट) अधिक महत्त्वाची असते."

कामाबाबत अजूनही सक्रिय

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, जीनत अमान आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सवरील The Royals या मालिकेत त्या झळकल्या होत्या. याशिवाय त्यांनी सत्यम शिवम् सुंदरम, डॉन आणि कुर्बानी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT