71st National Film Awards Presentation Ceremony
नवी दिल्ली : शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी आणि मोहनलाल सारख्या अनेक अभिनेत्यांना ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित केले जात आहे. भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम कलाकारांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये हा कार्यक्रम होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
प्रसिद्ध साऊथ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
चार दशकांहून अधिक काळ आणि ३४० हून अधिक चित्रपटांमध्ये मोहनलाल यांनी काम केले आहे. मल्याळमपासून तमिळ, तेलुगु, कन्नड अशा भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. सुपरस्टार मोहनलाल लवकरच त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'वृषभा' मध्ये दिसणार आहेत.
विक्रांत मेस्सी- १२ वी फेल-सर्वोत्कृष्ट अभिनेता
शाहरुख खान-जवान-सर्वोत्कृष्ट अभिनेता
राणी मुखर्जी-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री Mrs. Chatterjee vs Norway
मेघना गुलजार (दिग्दर्शिका)-सॅम बहाद्दूर
करण जोहर (दिग्दर्शक)-रॉकी और रानी की प्रेम कहाणी
अविनाश बेंडे- आत्मपॅम्फ्लेट
विधू विनोद चोप्रा (दिग्दर्शक)-12th फेल
ओडिया चित्रपट - द सी अँड सेव्हन विलेजेस - विशेष उल्लेखनीय सन्मान
उत्कृष्ट दिग्दर्शक - द सी अँड सेव्हन विलेजेस
मल्याळम चित्रपट- मेकल- विशेष उल्लेखनीय सन्मान
इंग्रजी चित्रपट- द सॅक्रेड जॅक- श्री हरिकृष्णन एस
इंग्रजी चित्रपट- मुवींग फोकस- निलादरी रॉय
हिंदी चित्रपट द फर्स्ट फिल्म - पियुष ठाकुर
कठहल - यथोवर्धन मिश्रा
रॉकी और रानी की प्रेम कहाणी - कोरिओग्राफर- वैभवी मर्चंट
सॅम बहाद्दूर - मेकअपमॅन-श्रीकांत देसाई
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- निधी गंभीर, दिव्या गंभीर
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट: फ्लॉवरिंग मॅन
उत्पल दत्ता-सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक
ओडिया चित्रपट - द सी अँड सेव्हन विलेजेस - विशेष उल्लेखनीय सन्मान
एव्हरी वन इज हिरो- मोहनदास
सर्वोत्कृष्ट संपादन- मिधुन मूरली-पुकल्लन
सर्वोत्कृष्ट ध्वनी- ॲनिमल (हिंदी) - हरिहरन मुरलीधरन
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईन- ॲनिमल (हिंदी)-सचिन सुधाकरन
पटकथा लेखक- बेबी (तेलुगू)
संवाद लेखन- बस एक बंदा काफी है (हिंदी) - दीपक कंगरानी
छायांकन- प्रशांत मोहपात्रा- द केरळ स्टोरी
पी व्ही एन एस रोहित - बेबी (तेलुगू)
वरील दिग्गजांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बालकलाकार - भार्गव सुनीता जगताप (मराठी चित्रपट नाळ)
नाळ-२ श्रीनिवास पोकळे - नाळ -२ (मराठी चित्रपट)
त्रिशा विविक ठोसर - नाळ -२ (मराठी चित्रपट)
कबीर खंडारे - जिप्सी (मराठी चित्रपट)
या वर्षीचे पुरस्कार बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी विशेष क्षण आहेत. सुपरस्टार शाहरुख खान विक्रांत मेस्सीसोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शाहरुख खानला ब्लॉकबस्टर 'जवान'मधील भूमिकेसाठी तर १२ वी फेल चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला सन्मानित करण्यात आले. महिला कॅटेगरीत, राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे मधील तिच्या प्रभावी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्तम अभिनेता - शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (१२ वी फेल)
सर्वोत्तम अभिनेत्री - राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे)
सर्वोत्तम हिंदी चित्रपट - कठहल
सर्वोत्तम फिचर फिल्म - १२ वी फेल
सर्वोत्तम कन्नड चित्रपट - द रे ऑफ होप
सर्वोत्तम महिला प्लेबॅक सिंगर - शिल्पा राव (जवान चित्रपटातील चलेया गाण्यासाठी)
सर्वोत्तम पुरुष प्लेबॅक सिंगर - पीव्हीएनएस रोहित (बेबी, तेलुगू)
सर्वोत्तम छायांकन - द केरळ स्टोरी
सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शन - रॉकी और रानी की प्रेम कहानी (धिंडोरा बाजे रे)
सर्वोत्तम मेकअप आणि कॉस्च्युम डिझायनर - सॅम बहादूर
विशेष उल्लेख - अॅनिमल (री-रेकॉर्डिंग मिक्सर) एमआर राजकृष्णन
सर्वोत्तम साऊंड डिझाइन - अॅनिमल (हिंदी)
सर्वोत्तम दिग्दर्शक - द केरळ स्टोरी (सुदिप्तो सेन)
सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट - रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्तम तेलुगू चित्रपट - भगवान केसरी
सर्वोत्तम गुजराती चित्रपट - वश
सर्वोत्तम तमिळ फिचर फिल्म - पार्किंग