70th National Film Awards
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर 3 मराठी माहितीपटांनी मोहोर उमटवली आहे File Photo
मनोरंजन

70th National Film Awards : ‘या’ 3 मराठी माहितीपटांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी दिल्लीत ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ ची घोषणा केली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार वाळवी या चित्रपटाला जाहीर करण्यात आला आहे. २०२२ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले.

२७ फीचर फिल्म पुरस्कार, १६ नॉन-फीचर फिल्म पुरस्कार आणि २ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर फिल्म पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे नेतृत्व निला माधब पांडा आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गंगाधर मुदलियार यांनी केले. कोविड-१९ मुळे या पुरस्कारांची घोषणा दोन वर्ष उशीरा झाली.

चार मराठी चित्रपटांची पुरस्कारावर मोहोर

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्या वाळवी चित्रपटाचे दिगदर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी चित्रपटाला नॉन फीचर पुरस्कार विभागातील ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी’ आणि ‘सर्वोत्कृष्ट कथन आणि आवाज पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोहिल वैद्य यांनी केले आहे. याबरोबरच ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक चित्रपट’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 'आणखी एक मोहेनजोदारो' या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे.

मल्याळम चित्रपट 'अट्टम' सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म

मल्याळम चित्रपट 'अट्टम'ने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर ऋषभ शेट्टीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, नित्या मेनन आणि मानसी पारेख या दोन अभिनेत्रींना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेमध्ये पोनियिन सेल्वन: १ या चित्रपटाला सर्वाधिक ४ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम

सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन आणि मानसी पारेख

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म होलसम एंटरटेनमेंट – कांतारा

सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा, प्रमोद कुमार

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – सौदी वेलाक्का

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पीएस १

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ २

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कार्तिकेय २

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला

दिग्दर्शक आणि प्रोड्युसर – साहिल वैद्य

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - प्रीतम (गीत), ए. आर. रहमान

SCROLL FOR NEXT