मनोरंजन

1000 कोटींच्या मानधनाचे वृत्त खोटे

स्वालिया न. शिकलगार

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'बिग बॉस'ची ओळख आहे. 'बिग बॉस'च्या घरात होणारे स्पर्धकांचे वाद, रुसवे फुगवे, खेळ, टास्कमुळे हा शो वादग्रस्त असला तरीही आवडीने पाहिला जातो. येत्या 1 ऑक्टोबरपासून बिग बॉस हिंदीचे 16 वे पर्व भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम आता अभिनेता सलमान खान याने घेतलेल्या मानधनामुळे चर्चेत आला आहे. सलमान या कार्यक्रमासाठी 1000 कोटींचे मानधन घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र सलमानने मानधनाच्या चर्चांवर खास शैलीत उत्तर दिले आहे. मला बिग बॉससाठी इतके पैसे मिळाल्याचे वृत्त खोटे आहे. 1000 कोटी रुपये नाही! किमान 999 कोटी तरी मानधन असेलच नाही. यावर तो म्हणाला, अरे असे काहीही नाही. याचे एक तृतीयांशही नाही. तुम्ही अतिशयोक्ती करून हा आकडा काढता आणि हजार कोटी, आयकर विभाग आणि ईडीही त्याची दखल घेतात. ते येतात आणि मग वास्तव काय आहे? ते कळते, असे सलमान खान म्हणाला.

SCROLL FOR NEXT