Anant Ambani Radhika Wedding
अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहेत.  
मनोरंजन

Anant-Radhika Wedding : 100 खाजगी जेट, फाल्कन-2000 विमाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Anant Ambani-Radhika Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी त्यांच्या लहानग्या अनंतच्या लग्नात कोणतीही कसर सोडत नाहीत. अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाचे सर्व कार्यक्रम तीन दिवस चालणार असून 14 जुलै रोजी संपणार आहेत. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. नुकताच संगीत आणि हळदी समारंभ पार पडला, ज्यामध्ये कुटुंबाव्यतिरिक्त अनेक सिनेतारकांनी सहभाग घेतला. मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर त्याच्यासाठी खास खासगी जेटही तयार करण्यात आले आहे.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाह सोहळा

अनंत-राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटर या शाही विवाह सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशिर्वाद कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहे.

सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.त्याशिवाय, भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गांविषयीचे माहितीपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये म्हटल्यानुसार, 12 जुलै दुपारी 1 वाजल्यापासून ते 15 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत हे नियम लागू राहतील. त्यामुळे या वेळेत मुंबईकरांना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

सुरक्षेसाठी NGS कमांडो

मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब झेड प्लस सुरक्षेत असेल. आयएसओएस (इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टीम) सेटअप देखील स्थापित करण्यात आला आहे. बीकेसीमध्ये सुरक्षा ताफ्यात 10 एनएसजी कमांडो आणि पोलीस अधिकारी, 200 आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक, 300 सुरक्षा सदस्य आणि 100 हून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी तैनात असतील.

2500 खाद्यपदार्थ

लग्नाच्या मेन्यूबद्दल सांगायचे तर, यात दोन हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असेल. असे सांगितले जात आहे की 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करतील.

अतिथींसाठी रिटर्न गिफ्ट

व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी रिटर्न गिफ्ट्स म्हणून खास बनवण्यात आलेली आणि कोट्यवधी रुपये किंमतीची घड्याळे देण्यात येणार आहेत. ही घड्याळे फक्त व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी असतील. तर राजकोट, काश्मीर आणि बनारसमधून बनवण्यात आलेल्या वस्तू उर्वरित पाहुण्यांसाठी देण्यात येतील.

SCROLL FOR NEXT