आनंद आहुजा-सोनम कपूर-डेविड बेकहम 
Latest

David Beckham Welcome Party: ‘या’ फुटबॉलरसाठी ग्रँड पार्टी, स्टनिंग लूकमध्ये सोनम-आनंद आहूजा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनम कपूर आणि आनंद आहूजाने फुटबॉलर डेविड बेकहमचे आपल्या घरी ग्रँड वेलकम केले. त्यासाठी त्यांनी वेलकम पार्टी ठेवली होती. अनेक बॉलीवूड सेलेब्सनी 'या' पार्टीला हजेरी लावली. (David Beckham Welcome Party) बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर-आनंद आहूजाने रात्री फुटबॉलर डेविड बेकहमचे ग्रँड वेलकम केलं. त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला आठवणीतले बनवण्यासाठी कपलने आपल्या घरी एक डिनर पार्टी ठेवली होती. यामध्ये अनिल कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि शाहिद कपूर यासारख्या स्टार्सनी पार्टीचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये बॉलीवूड सेलेब्सना धासू एन्ट्री करताना पाहिलं जाऊ शकतं. (David Beckham Welcome Party)

सोशल मीडियावर समोर आलेले फोटोज आणि व्हिडिओमध्ये सोनम कपूरने या पार्टीसाठी ट्रॅडिशनल लूक केलं होतं. ती यावेळी सुंदर साडीमध्ये दिसली. तिने लाईट मेकअपसोबत एका नेकलेसने आपला लूक पूर्ण केला होता. तर आनंद ब्लॅक कुर्तामध्ये स्पॉट झाला. पार्टीमध्ये सिंपल लूकमध्ये हे कपल खूपचं सुंदर दिसत होतं.

video-viralbhayani x वरून साभार

या पार्टीत संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि चुलत भाऊ मोहित मारवाह-अंतरा मारवाह यांच्यासोबत पोहोचले. अंतराने डेविडसोबतचा पार्टी फोटो शेअर केला. यामध्ये फुटबॉलर डेविडने ब्लॅक टी-शर्ट आणि मॅचिंग पँट आऊटफिट परिधान केला होता. अंतराने फोटो शेअर करत लिहिलं की, 'लेजेंड आणि जेंटलमेन डेविड बेकहमसोबत उत्तम रात्र.'

अंतराने फोटो कॅप्शन लिहिली की, 'अमेझिंग होस्ट सोनम कपूरसोबत.' सोबतच शनाया कपूर आणि रिया कपूर यांचाही फोटो समोर आला. यामध्ये दोघेही स्टनिंग दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT