Latest

BBM : टेन्शन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये : सोनाली पाटील

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कधी कधी सदस्यांना कळत नाही नक्की कसं वागावं. कोणावर विश्वास ठेवावा. कोण आपल्या बाजूने बोलतं आहे. कोणाच्या दबावामुळे एखादा सदस्य एकदम शांत होतो. ही गोष्ट घरातील इतर सदस्य पाहत असतात. अशावेळी ग्रुपमधील सदस्य, घरातील मित्र काही मोलाचा सल्ला देतात. ज्यामुळे पुन्हा एकदा उभारी येते. काहीसं आज देखील होणार आहे. आज विशाल, सोनाली आणि मीनल याबद्दलचं बोलताना दिसणार आहेत. टेन्शन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये असे सोनाली पाटील सांगताना दिसेल. सोनाली पाटील घरात सध्या चर्चेत आहे.

विशाल सोनालीला मोलाचा सल्ला देणार आहे. घरामध्ये असं कोणी तरी हवं ज्याच्याबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता. जो तुम्हाला सल्ला देखील देऊ शकेल.

सोनाली तिच्या मनातील गोष्ट आज विशाल आणि मीनलला सांगताना दिसणार आहे. सोनाली विशाल सांगणार आहे- "टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते.

विशाल सोनालीला सांगणार आहे. तू नको होऊस. तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का?

टास्कमध्ये तुझं काम होतं तिकडच्या पोरांना खिळवून ठेवायला हवं होतंस. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हाला माहिती आहे तुझी मेंटल परिस्थिती काय आहे. आम्ही समजू घेऊ. पण, बाहेर प्रेक्षकांना काय दिसत असेल सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले.

दुसर्‍या आठवड्यात फूल डाऊन. तूमध्ये कुठेच दिसत नाहीस. तुला जोडी दिल्यापासून तू… विकासलादेखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतो आहे. ही कोणाची नाही तुला कळलं आहे ना मग काही फरक पडत नाही.

आता नक्की हे कोणाबद्दल बोलत आहेत ? कोणामुळे सोनालीला त्रास होतो आहे ? विशाल कोणाबद्दल बोलतो आहे? हे कळेलच आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सीझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT