Sonalee Kulkarni  
Latest

Sonalee Kulkarni – सोनालीचा नो मेकअप लूक, फोटो पाहतचं राहाल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीची (Sonalee Kulkarni ) प्रत्येक अदा पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडावं. तिचा नो मेकअप लूक चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. (Sonalee Kulkarni )

सोनालीने थ्री-पीस ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये सोनाली विना मेकअपमध्ये खूप सुंदर दिसतेय.

तिने कुठलीही ज्वेलरी परिधान केलेली नाही. मोकळ्या केसांमध्ये तिचे फोटो पाहण्यासारखे आहेत.


सोशल मीडियावरून चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो अपलोड केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयासोबत ती नृत्यामुळे प्रसिद्धीस आली. तिने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये When it is the season to blossom, Why not flaunt it on the bosom असे म्हटले आहे. चाहते तिचे फोटो पाहून कौतुक करत आहेत.

सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले आहे. माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पुण्यायाच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयात पदवी घेतलीय. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT