Latest

जपानी न्यूक्लिअर फ्यूजनमधून निर्माण होणार सूर्यासारखी ऊर्जा

Arun Patil

टोकियो : ऊर्जेची गरज कशी भागवावी याच्या चिंतेत अवघे जग होते. आता त्यासाठी 'क्लिन एनर्जी'चे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. वीज ही जगाची मोठीच गरज आहे. अनेक उपकरणे विजेवरच चालत असतात. वीजनिर्मितीसाठी सध्या 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर'च्या पर्यायाचाही अवलंब केला जातो.

अणुऊर्जेच्या सहाय्याने वीजनिमिर्र्ती करण्यासाठी संशोधक नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. जगाच्या विकसित देशांमध्ये न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरच्या माध्यमातून वीज निर्मितीचे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. आता जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लँटने काम सुरू केले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्यूजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते.

नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचे नाव 'जेटी 60 एसओ' असे आहे. त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जात आहे. त्याचे जगातील अन्य प्रकल्पांपेक्षा काय वेगळेपण आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत जितके न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर काम करत आहेत, ते 'न्यूक्लिअर फिजन'वर आधारित आहे. त्याचा अर्थ आहे की तिथे अणुच्या विखंडनातून ऊर्जा निर्माण केली जाते.

मात्र 'जेटी 60 एसओ' हे 'न्यूक्लिअर फ्यूजन'वर काम करते. त्याचा अर्थ असा की हायड्रोजनच्या दोन अणुंना जोडून ऊर्जा निर्माण केली जाते. तिथे अद्याप व्यावसायिकरित्या ऊर्जानिर्मिती केली जात नाही. मात्र या प्रयोगात यश मिळाले तर कार्बन मुक्त ऊर्जा मिळवण्यासाठी हा एक महत्वाचा स्रोत ठरू शकतो. त्यामुळे प्रदूषणालाही लगाम बसेल व जगाची ऊर्जेची गरजही भागेल.

फ्यूजन रिअ‍ॅक्टरची वैशिटष्ये

* हे रिअ‍ॅक्टर सुमारे सहा मजली उंच आहे.
* डोनट या खाद्यपदार्थाच्या (आपल्याकडील मेदुवड्यासारख्या) आकारात बनवले आहे उपकरण.
* उपकरणाला 'टोकामाक' नाव दिले आहे.
* टोकामाकच्या आत प्लाझ्मा फिरवला जातो.
* प्लाझ्मा वेगाने फिरल्यावर तापमानाचा स्तर 2 कोटी अंशांवर जातो.
* जगभरातील 500 अभियंते या प्रकल्पात सहभागी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT