सोलापूर विद्यापीठ  
Latest

सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे निकाल जाहीर

निलेश पोतदार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पदवीधर मतमोजणीला काल (शुक्रवार) सकाळी 10 वाजता सुरुवात झाली होती. संपूर्ण रात्रभर ही मतमोजणी चालू होती. आज (शनिवार) सकाळी सात वाजता मतमोजणी संपताच निकाल जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये पक्षाचे वर्चस्व कायम राहण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपीसह अन्य पक्षांच्या नेतेमंडळींनी निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातील पदवीधर उमेदवारांचा विजय हा पक्षाचा विजय या भावनेने जोरदार तयारी केली होती.

अखेर आज सकाळी सात वाजता निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पुढीलप्रमाणे.. 

सिनेट – पदवीधर महिला (एक जागा)
१) कामूर्ती वर्षाराणी गिरीष – १३६४ मते (विजयी)
२) सपाटे मंजुळा मनोहर – १३२९ मते (पराभूत)
३) शिंदे राजश्री विजय – ११६२ मते (पराभूत)

सिनेट -पदवीधर DTNT (एक जागा)

१) होनमाने यतीराज चंद्रकांत – १४२७ मते (विजयी)
२) चौगुले शंकर सोमन्ना – १३२७ मते (पराभूत)
३) पाटील प्रशांत विष्णुपद – ११०२ मते (पराभूत)

सिनेट पदवीधर Open खुला प्रवर्ग ( ५ जागा )

(१) बंकुर चन्नबसप्पा – ६५४ मते ( विजयी )

(२) देशमुख अजिंक्य – ५६३ मते ( विजयी )

(३) दिड्डी राजेश – १४ मते ( पराभूत )

(४) डोंगरे गणेश – ७२४ मते ( विजयी )

(५) गायकवाड प्रवीण – २३१ मते ( पराभूत )

(६) गायकवाड सचिन – ६१४ मते ( विजयी )

(७) गवळी विजय – ०२ मते ( पराभूत )

(८) गुंड दीपक – १८५ मते ( पराभूत )

(९) इंगळे केशव – ३३ मते ( पराभूत )

(१०) कस्तुरे जीवराज – ११७ मते ( पराभूत )

(११) खुळे सचिन – १७८ मते (पराभूत )

(१२) महाडिक तेजस्विनी – ०७ मते ( पराभूत )

(१३) मोरे गणपत – २७१ मते ( पराभूत )

(१४) मुळे संजय – १५ मते ( पराभूत )

(१५) नागणे सुनील – ०८ मते ( पराभूत )

(१६) पाटील आनंद – ११ मते (पराभूत )

(१७) पवार गणेश – ४०५ मते ( पराभूत )

(१८) पिस्के संदीप – १९७ मते ( पराभूत )

(१९) संगवे अजिकुमार – ६६७ मते ( विजयी )

(२०) शेख एजाज – ४२६ मते ( पराभूत )

राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी

ओबीसी – नीता मंकणी
डीटीएनटी- यतीराज होनमाणे
महिला – वर्षा कामूर्ती
एससी – राजाभाऊ सरोदे (यापूर्वीच बिनविरोध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT