पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरचे तोतया पत्रकार महेश सौदागर हनमे (वय 47) आणि दिनेश सौदागर हनमे (वय 44, दोघे रा. राजेश्वरी नगर, ब्लॉक नं. 112, बाळे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी पुणे आणि सोलापूर स्थित बिल्डरकडे 50 लाख रूपये आणि 2 फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याबाबत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. दरम्यान, तोतया पत्रकार हनमे बंधुंना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दि. 23 मे 2023 पर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे. (Extortion Case)
याबाबत अधिक माहिती अशी की, खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे 5 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार हनमे बंधुंना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 ने अटक केली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले असता हनमे बंधुंनी पोलिसांच्या अंगावार चारचाकी घालून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखून बचावासाठी त्यांच्या गाडीच्या मागील टायरच्या दिशेने गोळीबार देखील केला होता. त्यांना पाठलाग करून अटक करण्यात आले होते. (Extortion Case)
हनमे बंधुंना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दि. 23 मे 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हनमे बंधुंचे आणखी एक खंडणी प्रकरण उजेडात आले आहे. त्याबाबत गुन्हे शाखेचे पोलस सखोल तपास करीत आहेत. पुण्यातील भोसरीमध्ये राहणार्या एका बिल्डरची कन्स्ट्रक्शन साईट सोलापूर येथे सुरू आहे. हनमे बंधुंनी त्या बिल्डरकडे देखील 50 लाख रूपये आणि 2 फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे संपर्क साधला असून पोलिस त्याबाबतचा तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Extortion Case)
हनमे बंधुंना पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव पोलिस अंमलदार विजय गुरव, पोलिस प्रदिप शितोळे, पोलिस विनोद साळुंके, पोलिस संग्राम शिनगारे, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस सैदोबा भोजराव, पोलिस सचिन अहिवळे,पोलिस अमोल पिलाने, पोलिस चेतन आपटे, पोलिस अनिल मेंगडे, पोलिस इश्वर आधंळे, पोलिस राहुल उत्तरकर, पोलिस पवन भोसले, पोलिस चेतन शिरोळे, पोलिस प्रदिप गाडे, पोलिस किशोर बर्गे आणि पोलिस आशा कोळेकर यांच्या पथकाने अटक केली होती.
दरम्यान, हनमे बंधुंनी अशा प्रकारे आणखी कोणाला खंडणी मागितली असल्यास त्यांनी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा :