सांगोला: पुढारी वृत्तसेवा: सांगोला – जत रस्त्यावर सोनंद येथे शेतमजुरांना घेऊन पंढरपूरकडे येणाऱ्या क्रुझरचा टायर फुटून पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात ३ शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या. तर ८ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.११) सकाळी ८ च्या सुमारास घडली. गीता रविंद्र दौडमनी (वय ३९, रा. बळीगिरी, ता. अथणी जि. बेळगाव), कस्तुरी शंकर भिरडे (वय ६४, मलबाद, ता. अथणी, जि. बेळगाव), महादेवी श्रीषैल चैगुला (वय ४०, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत. क्रुझर चालक कुमार उर्फ श्रीनिवास काहाप्पा जगदाळ (वय २५, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Solapur News
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी आठच्या सुमारास सांगोला – जत रोडवरील सोनद गावाजवळील चव्हाण मळ्याजवळ, लक्ष्मीनगर हद्दीत (ता. सांगोला) (केए २४ एम ११२१) या भरधाव क्रुझर गाडीचा डाव्या बाजुचा मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. ही गाडी १२ शेत मजुरांना घेऊन कासेगाव (ता. पंढरपूर) येथे निघाली होती.
या अपघातात गीता रविंद्र दोडमनी (वय ३९, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव), कस्तुरी शंकर भिरडे (वय ६४, मलबाद ता. अथणी, जि. बेळगाव), महादेवी श्रीषैल चैगुला (वय ४०, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव) गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उज्ज्वला बसाप्पा दोडमनी (वय ३५, रा. बळीगिरी, ता. अथणी जि. बेळगाव), सविता बिराप्पा चैगुला (वय २९, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव),
उर्वरीत मायाव्या बसप्पा दोडमनी (वय ३६, रा. बळीगिरी), सत्याव्वा उर्फ महानंदा इराप्पा चैगुला (वय ३०, रा. बळीगिरी), राजक्का कमल दोडमनी (वय ४५, रा. बळीगिरी), अष्दीनी काकासाहेब दोडमनी (वय ३०, रा. बळीगिरी), महादेवी रायसाहेब दोडमनी (वय ३०, रा. बळीगिरी), गीता बसाप्पा मड्डीमनी (वय ४२, रा. बळीगिरी), राजश्री विठ्ठल काळेगोळ (वय ३०, रा . मंलबाद मीरा) जखमी झाल्या आहेत.
या अपघाताची फिर्याद जखमी कविता अमर दिवटे (वय ३०, रा. बळीगिरी) यांनी दिली. चालक कुमार उर्फ श्रीनिवास काहाप्पा जगदाळ (वय २५, रा. बळीगिरी) याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा