Latest

Softwear Engineer Salary : टेक दिग्गजांपेक्षा स्टार्टअप्स देतात सॉफ्टवेअर अभियंत्यांना जास्त पगार!

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Softwear Engineer Salary : एका ट्विटर थ्रेडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डेटा संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांपेक्षा स्टार्ट कंपन्या आपल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांना जास्त पगार देतात, असा दावा आकडेवारीनुसार केला आहे. यामध्ये असेही म्हटले आहे की सेवा क्षेत्रातील आणि स्टार्टअपमधील पगाराची तफावत ही तब्बल 160 टक्के आहे. वीकडे नावाच्या स्टार्टअपमध्ये काम करणार्‍या अमित सिंगने ट्विटरवर हा थ्रेड शेअर केला आहे.

Softwear Engineer Salary : या ट्विटर थ्रेडने या संशोधनासाठी 50k पेक्षा जास्त अभियंत्यांच्या पगाराचा अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासाद्वारे सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या वेतनमानावर काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच स्टार्टअप अभियंत्त्यांच्या पगाराचा अभ्यास करून त्याची तुलना दिग्गज टेक कंपन्यांमध्ये काम करणा-या सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या पगाराशी करण्यात आली आहे.

थ्रेडमध्ये सामायिक केलेल्या इन्फोग्राफिकनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat एकूण 107 भारतीय युनिकॉर्नपैकी आपल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांना सर्वोच्च पॅकेज ऑफर करते. सोशल मीडिया पोस्टनुसार शेअरचॅटवर काम करण्याचा चार वर्षांचा अनुभव असलेल्या अभियंत्याचा पगार ₹ 47 लाख प्रतिवर्ष (LPA) आहे. Softwear Engineer Salary

CRED ही फिनटेक कंपनी या यादीत पुढे आहे. एक सॉफ्टवेअर अभियंता ₹ 40 LPA पगार घेतो. Meesho, Swiggy, Deam11 आणि InMobi सारख्या कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांना 35 ते 40 LPA देतात.

इतर युनिकॉर्न, ओयो, पेटीएम आणि बायजू हे आपल्या अभियंत्यांना पगार देण्याच्या यादीत खूप खालच्या स्थानावर येते. जेथे सॉफ्टवेअर अभियंत्यांना 20-25 एलपीएचे सरासरी पॅकेज मिळते. ShopClues त्याच्या तंत्रज्ञानाला सरासरी ₹ 12 LPA देते.

Softwear Engineer Salary जेव्हा भारतीय युनिकॉर्नमधील सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या वेतनवाढीच्या चक्राचा विचार केला जातो. तेव्हा या कर्मचार्‍यांना अनुभव मिळाल्याने त्यांच्या वेतनात केवळ 10 टक्के वाढ झाल्याचे डेटावरून दिसून आले. अमित सिंगच्या म्हणण्यानुसार, "लोकांना वारंवार का बदलायला आवडते हे स्पष्ट करते."

उत्पादन-आधारित स्टार्टअप्समधील सॉफ्टवेअर अभियंत्यांची कमाई आणि TCS, Infosys आणि Wipro सारख्या सेवा-आधारित कंपन्यांमध्ये काम करण्याच्या कमाईची तुलना देण्यात आली आहे. उत्पादन स्टार्टअप्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा-आधारित कंपन्यांमधील तंत्रज्ञांपेक्षा 160 टक्के जास्त पगार मिळत असल्याचे दिसून आले.

शेअर केलेल्या डेटानुसार, मोठ्या तंत्रज्ञानातील चार वर्षांचा अनुभव असलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याचा पगार 10 एलपीए आहे, तर स्टार्टअप्स 26 एलपीएचे पॅकेज ऑफर करत आहेत.

Softwear Engineer Salary काही दिवसांपूर्वीच विप्रोच्या अध्यक्षांनी मूनलाइटनिंगचा ठपका ठेवत अनेक कर्मचा-यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या पगाराकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT