नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'पंतप्रधान-टीबी मुक्त भारत अभियान' अंतर्गत देशभरातील ९ लाखांहून अधिक क्षयरोगग्रस्तांनी सामाजिक सहकार्य घेण्यासंबंधी आपली सहमती दर्शवली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी अशी माहिती दिली. सामाजिक सहकार्यासाठी सहमती दर्शवणाऱ्या ९ लाख ४२ हजार ३२१ रुग्णांपैकी २ लाख ५ हजार ३४ रुग्ण एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रातील १ लाख ७ हजार १७१ तसेच मध्य प्रदेशातील ९१ हजार २४ रुग्णांचा यात समावेश आहे. लक्षद्वीप मधील केवळ ९ रुग्ण तर तामिळनाडू मधील १ हजार ६८ रुग्णांनी सार्वजनिक सहकार्य घेण्यास सहमती दर्शवली आहे.
क्षयरोगग्रस्त जवळपास १३ लाख ५१ हजार ७२५ रुग्णांचा पूर्वी पासूनच सरकारच्या सहकार्याने उपचार सुरु आहे. सर्वाधिक घातक रोगाचा नायनाट करण्यासाठी राज्यांच्या सहकार्याने २०२५ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'टीबी-मुक्त भारत'चे लक्ष प्राप्त करणार आहे.
नि-क्षय मित्रांना क्षयरोगग्रस्तांच्या देखभाल करण्यासाठी ही योजना प्रोत्साहित करते. एखादी व्यक्ती, कॉर्पोरेट, एनजीओ, राजकीय पक्ष अथवा संस्था या नि-क्षय असू शकतात.
क्षयरोगग्रस्तांना सहकार्य, अतिरिक्त तपासण्या तसेच इतर मदत पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे.देशात विद्यमान स्थितीत राष्ट्रीय सर्वेक्षण २०१९-२१ नुसार १ लाख लोकसंख्येमागे ३२१ व्यक्त क्षयरोगगग्रस्त आहेत. दिल्लीत सर्वाधिक १ लाख लोकसंख्येमागे ७४७ व्यक्ती क्षयरोगाने ग्रस्त आहेत.