पुढारी ऑनलाईन: सोशल मिडियावरून अनेकदा अशा काही गोष्टी डोळ्यांसमोर येतात की, ज्या पाहिल्यानंतरही विश्वास ठेवणे कठीण होते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. मात्र काहीवेळा काही आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. सध्या पक्ष्याच्या तोंडातून धूर योणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये, एक सुंदर पांढरा पक्षी आपल्या तोंडातून 'स्मोक' बाहेर काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की, हा सुंदर पक्षी जणू काही 'स्मोकिंग'च (Smoking bird) करत आहे.
जंगलात राहणाऱ्या हजारो प्राणी पक्ष्यांपैकी ठराविकच प्रजाती आपलेल्या परिचित असतात. त्यामुळेच जेव्हा या अनोख्या पक्ष्याचा 'स्मोकिंग' व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला, तेव्हा तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चेन्नईचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM), अनंत रुपनागुडी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये छायाचित्रकार एका अनोख्या पक्ष्याचे जवळून फोटो काढताना दिसत आहे. क्लिप चालू असताना, पक्षी स्पष्टपणे दिसत आहे. पांढरी पिसे आणि निळसर गळा असलेला हा पक्षी अपवादात्मकच पहायला मिळतो. हा पक्षी विशिष्टप्रकारे शिळ घालत, शेवटी तो थोडावेळ थांबतो अन् तोंडावाटे धूर बाहेर काढतो. त्यामुळे हा पक्षी स्मोकिंग (Smoking bird) करत असल्याचा जणू भासच होतो.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत 276.9K व्यूव्ह मिळाले आहेत. तसेच 10.3K नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या क्लिपमधील पक्षी (Smoking bird) हा बेअर-थ्रेटेड बेल असल्याची खात्री दर्शवली आहे. जो प्रामुख्याने ब्राझीलमध्ये आढळून येतो.