Latest

Oscar Party : गायक अलीने ऑस्करमध्ये गायले लता मंगेशकरांचे गाणं (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकेत प्री ऑस्कर पार्टी ( Oscar Party ) आयोजन केले होते. या पार्टीत आरआरआर फेम राम चरण आणि ज्युनियर एनटीआर याच्यासह अनेक बॉलिवूड कलाकर सहभागी झाले होते. यादरम्यान पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पार्टीत पाकिस्तानी गायक अली सेठीने दिवंगत स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे सुपरहिट गाणे गायले.

प्री ऑस्कर पार्टीत ( Oscar Party ) पाकिस्तानी गायक अली सेठीने दिवंगत स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पार्टीत खास करून त्याने १९६५ मधील 'जब जब फूल खिले' या चित्रपटातील 'ये समा' हे गाणे वेगळ्या शैलीत गायले. अलीचे 'पसूरी' हे गाणे सोशल मीडियावर हिट झाले आहे. यावेळी अभिनेत्री पल्लवी शारदा गाण्यावर डान्स करताना दिसली. तर इतर कलाकारांनी पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.

हे गाणे सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. 'हॉलिवूडच्या प्रवाहात लतादीदींचे गाणे गायल्याने आनंद आहे'. 'तुम्ही हा व्हिडिओ किती वेळा पाहिला?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT