Latest

नांदेड : सशस्त्र दरोड्याचा डाव सिंदखेड पोलिसांनी उधळला; ५ दरोडेखोर ताब्यात

backup backup

वाई बाजार (जि. नांदेड), पुढारी वृत्तसेवा : माहूर सारखणी राष्ट्रीय महामार्गावर दगडाची पऊळ रचून सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव गस्तीवर असलेल्या सिंदखेड पोलिसांनी उधळला. पोलीसांनी सदर दरोडेखोरांकडील शस्त्रास्त्र जप्त करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच विविध ठिकाणच्या तब्बल दहा गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली.

२१ डिसेंबर च्या मध्यरात्री सिंदखेड पोलिसांचे गस्त पथक माहूर सारखणी महामार्गावर आले असता, रोडवर दगडाची पऊळ लावून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे काहीजण पोलीसांना दिसून आले. यावेळी अधिक चौकशी करून पाहणी केली असता त्यांच्याकडे असलेली पांढ-या रंगाची इंडिका विस्टा कार क्र MH 30 AA 0169 ची तपासणी केली. त्यावेळी गाडीत एका मोठ्या धारदार तलवारीसह इतर घातक हत्यारे आढळून आली. त्यावरून सदरचे व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आला.

त्यामुळे पीएसआय दिपक भोपळे यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 166/2021 कलम 399, भादवी व 4/25 भारतीय हत्यार अधिनियम अन्वये संशयीत विवेक किशन दामोदर (वय 22, रा. रामनगर बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ), कपिल ज्ञानेश्वर मारकड (वय 22, रा.रामनगर बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ), अंकुश हनुमान हाके (वय 30,रा. धानोरा ता. पुसद जि. यवतमाळ), अजय वाघु जाधव (वय 24, रा.के. आर. के. कॉलनी आदीलाबाद जि. आदीलाबाद), लखन लक्ष्मण राठोड (राहणार लांजी तालुका माहूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता, माहूर येथील 3, महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील 3, वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील 1, नारनुर व गुढीहातनुर जि. आदीलाबाद येथील 2 तसेच आर्णी येथील 1 असे एकूण 10 चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT