सिद्धू मूसेवाला 
Latest

Sidhu Moosewala murder : मूसेवाला हत्‍या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन बिश्‍नोईला अजरबैजान येथे अटक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्‍या प्रकरणी पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्‍य आरोपी गँगस्‍टर सचिन बिश्‍नोई याला अजरबैजान येथे अटक करण्‍यात आली आहे. ( Sidhu Moosewala murder ) बिश्‍नोई हा लाँरेंस गँगला बाहेरुन आदेश देत असल्‍याचे पोलिस चौकशीत स्‍पष्‍ट झाले आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके नावाच्या गावात झाली होती. मुसेवाला हत्‍याकांड प्रकरणी २६ ऑगस्‍ट रोजी पोलिसांना १ हजार ८५० पानांचो दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्‍ये एकुण २४ आरोपी असून यातील २० जणांना अटक करण्‍यात आली आहे. चार आरोपींनी विदेशात आश्रय घेतला होता. यामध्‍ये मुख्‍य आरोपी सचिन बिश्‍नोईचाही समावेश होता. गोल्‍ही बरार, अनमोल बिश्‍नोई आणि लिजिन नेहरा या तिघे विदेशात असून त्‍याचाही शोध घेण्‍यात येत असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

तपासाची माहिती देताना पोलीस अधीक्षक गौरव तोरा यांनी सांगितले की, मूसेवाला हत्‍या प्रकरणी ३४ जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. यातील २४ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आले आहे. तर हत्‍येत सहभागी असणारे जगरुप रुपा आणि मनप्रीत मनु कुस्‍सा हे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत.

Sidhu Moosewala murder : सचिन बिश्‍नोई याने दिली होती खुनाची सुपारी

सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार ( Goldy Brar )  याने घेतली होती. बिश्नोई यानेच तुरुगांतून मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली गोल्‍डी याने दिली होते. बिश्नोईचे दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांत गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. बिश्नोई आधी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता नंतर त्याने वाहने चोरी सारखे गुन्हे सुरू केले. बिश्नोईच्या गँगमध्ये ७०० च्यावर गुंड आहेत. बिश्नोईने एकदा अभिनेता सलमान खानला ठार करू जाहीर धमकी दिली होती. राजस्थानमधील गँगस्टर आनंदपाल सिंग पोलीस कारवाईत मारला गेला, त्यानंतर सिंग याच्या टोळीतील अनेक गुंड बिश्नोई टोळीत सामील झालेहोते. आता मुसेवाला यांच्‍या हत्‍यनंतर पंजाबमध्‍ये गँगवॉरचा भडका उडण्‍याची शक्‍यता आहे.

कोण आहे गोल्‍डी बरार?

सध्‍या कॅनडामध्‍ये वास्‍तव्‍यास असणारा २८ वर्षीय गोल्‍डी बरार याचे मूळ नाव सतिंदर सिंग असे आहे. कॉलेजपासूनच त्‍याचा वावर गुन्‍हेगारांबरोबर सुरु झाला. पंजाब पोलिसांना विविध गुन्‍ह्यात हवा असणारा गोल्‍डीला न्‍यायालयाने फरार घोषित केले आहे. खून, खूनाचा प्रयत्‍न, खंडणी अशा गंभीर स्‍वरुपाचे तब्‍बल १६ हून अधिक गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल आहेत.

टोळीचा म्‍होरक्‍या लॉरेंस बिश्‍नोई याला अटक झाल्‍यानंतर टोळीचे सर्व व्‍यवहार हे गोल्‍डीकडे आले. पंजाबमधील अनेक
गुन्‍ह्यांमधील तो वॉडेंट आहे. काही दिवसांपूर्वी फरीदपूर न्‍यायालयाने जिल्‍हा युवा काँग्रेसचे अध्‍यक्ष गुरलाल सिंह पहलवान यांच्‍या हत्‍या प्रकरणी बरार याच्‍याविरोधातअटक वाँरट जारी केले होते. गोल्‍डी ही कॅनडामध्‍ये राहून पंजाबमधील गुन्‍ह्यात सक्रीय असल्‍याचे पोलिस तपासात स्‍पष्‍ट झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT