Shukra Gochar 2022 
Latest

Shukra Gochar 2022 : शुक्राची बदलती ‘चाल’ या राशी होतील ‘मालामाल’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shukra Gochar 2022: आयुष्य कधीही एकसारखे नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी सुख तर कधी दुःख असते. कधी नफा तर कधी तोटा, तर कधी मोठा धनलाभ होतो. असेच काहीसे 'या' चार राशीच्या लोकांसोबत होणार आहे. लवकरच या वर्षीचे 2022 चे शुक्र गोचर सुरू होणार आहे. त्यामुळे मोठा धनलाभ संभवतो. किंबहुना 'या' चार राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. चला तर जाणून घेऊ या राशी कोणत्या? आणि का होणार त्यांना धनलाभ!

Shukra Gochar 2022: आज 5 डिसेंबरपासून शुक्राचा गुरुच्या राशीत प्रवेश

येत्या 5 डिसेंबरला शुक्र ग्रहाचा धनु राशीत प्रवेश होईल. धनु राशी दार्शनिक आणि धर्माशी संबंधित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी, भोग लाभ, वैभव प्रदान करणारा ग्रह आहे. त्यातच अंकशास्त्रानुसार 2022 हे वर्ष शुक्राचे वर्ष आहे. त्यामुळे या वेळी दुहेरी योग होत असल्याने धन आणि सुख समृद्धीसह प्रेम, आणि गृह सौख्याचाही लाभ होणार आहे.

ज्योतिष शास्त्रांनुसार गुरु ग्रहाला देवांचा गुरू मानण्यात आले आहे. शुक्र ग्रहाला असुरांचा गुरू मानण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी शुक्राला अत्यंत शुभ ग्रह मानण्यात आले आहे. गुरूला वेदांचे ज्ञान तर शुक्राला आंतिरक ज्ञान आहे. त्यामुळे जेव्हा या दोघांचे मिलन होते तेव्हा जातकाला सिद्धी प्राप्त होते. तसेच मोठा धनलाभ होतो. त्यामुळे शुक्राचे गोचर खालील चार राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पाडणारे आहे. वाचा कोणत्या आहेत या राशी आणि कसा होईल धनलाभ!

1. मेष राशी – Shukra Gochar 2022: ज्या लोकांची राशी मेष आहे त्यांच्यासाठी शुक्र धन आणि सप्तम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे त्यांचे भाग्य भाव मध्ये गोचर करेल. शुक्राची दृष्टी तुमच्या पराक्रम भावावर पडत आहे. शुक्राच्या या गोचरमुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या भाग्यात वृद्धी होईल. जे लोक धार्मिक आहेत त्यांना या काळात त्यांच्या पुण्यकर्मामुळे मोठा लाभ संभवणार आहे. तसेच जर तुम्ही धार्मिक आहात आणि धार्मिक प्रवचन तसेच प्रवचन करत असाल तर तुम्हाला यावेळी जनतेची निश्चितच साथ मिळणार आहे. या काळात केलेल्या यात्रेत संपूर्ण लाभ मिळणार आहे. तसेच नवीन काम सुरू करण्यासाठी देखील धन मिळणार आहे. धन-वैभव या सोबतच पती-पत्नींमधील प्रेम वाढेल तुम्ही कुटुंबसाह एकत्रित प्रवास करून फिरायला जाऊ शकता.

2.सिंह राशी – Shukra Gochar 2022: या राशीच्या लोकात शुक्राचे गोचर दुहेरी लाभ घेऊन येणार आहे. धनासोबत प्रेम, रोमँस सर्वच घेऊन येणार आहे. या राशीत शुक्र तीस-या आणि दहाव्या भावाचे स्वामी आहेत. शुक्राचे गोचर तुमच्या पंचम भावत होणार आहे. आणि पंचम भाव हा प्रेमाचा आहे. तर शुक्राची दृष्टि तुमच्या लाभ स्थानात आहे. त्यामुळे या राशीतील लोकांना या काळात प्रेम आणि धन असे दोन्हीही मिळणार आहे. मुलींना प्रेमी मिळेल तर मुलांना प्रेमिका मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक मीडिया, फॅशन, ग्लॅमरच्या व्यवसायात आहेत. त्यांच्यासाठी हे खूप प्रसिद्धी प्राप्त करणारे आहे. महिलांना मोठ्या कंपनीतून ऑफर येऊ शकतात. तर नवविवाहितांना गर्भधारणेसाठी हा काळ अनुकूल आहे.

3.वृश्चिक राशी – Shukra Gochar 2022: या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र सप्तम आणि द्वादश भावाचे स्वामी आहेत. शुक्राचे गोचर यावेळी आपल्या दुस-या भावात आहे दुसरा भाव धनाचा आहे. तर शुक्राची दृष्टी तुमच्या अष्टम भावावर आहे. त्यामुळे तुम्हाला विदेशातून धन प्राप्ती होईल. तसेच व्यावसायिक नाते भागिदारी यांमध्ये तेजी येईल. लोक तुमच्या वाकचातुर्यामुळे प्रभावित होतील. त्यामुळे तुम्हाला व्यावसायिक यश प्राप्त होईल. तर एखाद्य महिला मित्राकडून धनप्राप्तीचा देखिल योग आहे.

4.कुंभ राशी – Shukra Gochar 2022: या राशीतील व्यक्तींसाठी शुक्र हा परम राजयोग कारक असतो. या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र हा चौथ्या आणि भाग्य भावाचा स्वामी असून शुक्र या वेळी आपल्या लाभ भावात शुक्राचे गोचर आहे. तर शुक्राची दृष्टि यावेळी आपल्या पंचम स्थानी जात आहे. या सर्व योगांमुळे तुमचे अनेक दिवसांपासून अटकलेले काम पूर्ण होणार आहे. तुम्हाला कुटुंब मित्र परिवाराकडून खूप सहाय्यता मिळेल. हे योग सौंदर्य प्रसाधन व्यवसाय, लेखन अभिनय आणि कला क्षेत्रातील लोकांना मोठा लाभ होणार आहे. त्यांना नवीन प्रस्ताव येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT