shradha kapoor  
Latest

Shraddha Kapoor ने लम्बोर्गिनी तर Pooja Hegde ने खरेदी केली रेंज रोव्हर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड असो वा दक्षिण भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेने दसऱ्याच्या निमित्ताने चमचमती रेंज रोव्हर गाडी खरेदी केली आहे. तिने निळ्या रंगाची रेंज रोवर SV गाडी खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाडीची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या अधिकृतरित्या इन्स्टाग्रामवर पूजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच श्रद्धा कपूरनेदेखील लम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. (Shraddha Kapoor )

अभिनेत्री पूजाकडे पोर्शे केयेन (२ कोटी रुपये), Jaguar (६० लाख रुपये) आणि ऑडी ७-सीरीज (८० लाख रुपये) कार कलेक्शन आहे. आगामी चित्रपट 'देवा'मध्ये पूजा दिसणार आहे. ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. 'देवा' पुढील वर्षी दसऱ्याच्या ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

(video – viral bhayani Instagram वरून साभार)

Shraddha Kapoor ने नवी Lamborghini कार खरेदी केली आहे. तिच्याकडे BMW 7 आणि Mercedes आहे. आता तिच्या गाड्यांच्या यादीत लम्बोर्गिनीची भर पडलीय. शक्ती कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरने ब्रँड न्यू लम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. अभिनेत्री श्रद्धा हिला कार्सची आवड आहे. कारचे शोरूम Automobili Ardent India ने पोस्टच्या माध्यमातून श्रद्धाने न्यू लेम्बोर्गिनी खरेदी केल्याची माहिती दिली आहे. शोरूमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धाच्या अनेक कारसोबतचे फोटोज शेअर केले आहेत.

शोरूमने न्यू लेम्बोर्गिनीसोबत श्रद्धाचे फोटोज पोस्ट करत लिहिले- 'कोणतीही विचित्र पद्धत नाही, श्रद्धा कपूरने आतापर्यंत एक ह्यूराकन टेक्निका खरेदी केली आहे! बॉलीवूडमधील सर्वात वेगळी आणि श्रद्धा कपूर रोसो एंटेरोस लेम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निकाला पिक अप करताना पाहणे इंफिनिटली कूल करणारा आहे.'

इतकी आहे लम्बोर्गिनी कारची किंमत

शोरूमने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये श्रद्धा कपूर व्हाईट कलरच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. कपाळावर बिंदी मोकळे केस, नो मेकअप लूकमध्ये ते खूप सुंदर दिसत आहेत. ती आपल्या ब्रँड न्यू रेड कलरच्या लम्बोर्गिनी कारसोबत पोझ देताना दिसत आहे. या कारची किंमत ४.०४ कोटी रुपये आहे. ऑटोटेक पोर्टलनुसार, आधीही श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली आहे. त्याची किंमत २.४६ कोटी रुपये होती. त्याआधी तिच्याकडे Mercedes Benz GLE होती, त्याची किंमत १.०१ कोटी रुपये होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT