पुणे, पुढारी : पुणे जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागामध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शनच्या मागणीकरिता जिल्हा परिषदेत आलेल्या विधवा महिलेकडे झेडपीच्या कर्मचाऱ्याने पेन्शन मिळवून देण्यासाठी चक्क किसची मागणी केली. या प्रकाराने महिलेला जबर धक्का बसला असून तिने या संदर्भात थेट मुख्याधिकऱ्यांकडे तक्रार केली आहे.
आरोग्यसेवक म्हणून कार्यरत असलेल्या आणि आरोग्य विभागात आरोग्यसेवक असलेले सध्या लिपिकाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्याचे समजत आहे. संबंधित महिला अनेकदा या कामासाठी जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत होती; परंतु प्रत्येक वेळी त्यांना पुन्हा येण्यास सांगण्यात आले. अनेक वेळा चकरा मारूनही या महिलेचे काम झालेच नाही आणि हा घृणास्पद प्रकार घडला.या प्रकाराने घाबरलेल्या, महिलेने मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांच्याकडे याबद्दलची तक्रार केली.
प्रकरण विशाखा समितीकडे
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यासाठी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवल आहे .