Indian Navy Day 2023 
Latest

Indian Navy Day 2023 : शिवराजेश्वर मंदिर, छत्रपतींच्या हाताचा ठसा अन् बरंच काही

Arun Patil

कोल्हापूर : Indian Navy Day 2023 शिवराजेश्वर मंदिरासमोरील सभा मंडप, शिवछत्रपतींच्या हाता-पायाच्या ठशाचे संवर्धन, शिवरायांच्या तलवारीचे जतन आणि आजही करवीर छत्रपती घराण्याकडून दिले जाणारे जिरेटोप व वस्त्रे अशा विविध संदर्भासह सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध शिवकाळापासून आजतागायत अखंड जपण्यात आले आहेत. भारताला लाभलेल्या तब्बल 6 हजार किलोमीटर समुद्रकिनारा व अनेक बंदरे यांचा उपयोग करून घेण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मराठा आरमाराची स्थापना केली. सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, पद्मदुर्ग यांसारख्या जलदुर्गाची साखळी निर्माण केली. या आरमाराच्या जोरावर इंग्रज, डच, पोर्तुगीज या परदेशी लोकांवर शिवरायांनी जरब बसविली. यामुळे शिवछत्रपतींचा जगभर गौरव 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' (भारतीय आरमाराचे जनक) असा केला जातो.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग

सन 1714 नंतर राजाराम महाराज यांचे द्वितीय पुत्र संभाजी महाराज यांच्या पत्नी जिजाबाई यांनी 21 नोव्हेंबर 1763 रोजी सिंधुदुर्गचा सुभेदार येसाजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामधून खूप माहिती मिळते. Indian Navy Day 2023 जिजाबाईंनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणार्‍या शिवछत्रपतींच्या उजव्या हाताचा व डाव्या पायाच्या ठशांच्या संरक्षणासाठी छोट्या घुमट्या (गची व कोनाडा) बांधून घेतल्या. तसेच येथे नैवेद्य व दिवा लावण्याची तरतूद केली. इसवी सन 1764 ला सिंधुदुर्ग इंग्रजांनी ताब्यात घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस केले होते. जिजाबाईंनी तो अथक प्रयत्नांनी परत मिळविला.

शिवभक्त राजर्षी शाहू महाराज

शिवछत्रपतींचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्गावर Indian Navy Day 2023 शिवरायांचे पहिले मंदिर बांधले. मंदिरात शिवछत्रपतींची काळ्या पाषाणातील विरासनातील मूर्ती बसविली. पुढे राजर्षी शाहू महाराज यांनी सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरासमोर भव्य सभामंडप बांधला (इसवी सन 1906-07). यासाठी 3850 रुपयांचा खर्च आला होता. या मंदिराप्रमाणेच त्यांनी पन्हाळगड व कोल्हापूर येथे शिवरायांची मंदिरे बांधली. सिंधुदुर्गावरील शिवछत्रपतींच्या हाताच्या ठशावरून राजर्षी शाहूंनी चांदीच्या हाताचा ठसा तयार करून घेतला होता. आजही कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात हा हाताचा ठसा पाहायला मिळतो.

इतिहास जतन-संवर्धनाचे कार्य

सह्याद्री प्रतिष्ठान, सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, अ.भा. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या इतिहासाच्या जतन-संवर्धनाचे कार्य संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. Indian Navy Day 2023 इंद्रजित सावंत लिखीत 'सिंधुदुर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन सिंधुदुर्ग किल्ल्यातच झाले. शिवराजेश्वर मंदिरात असणारी शिवछत्रपतींच्या वापरातील तलवार खार्‍या वार्‍यामुळे खराब होऊ लागली होती. तिचे संरक्षण व्हावे यासाठी संभाजीराजे यांनी काचेची पेटी व नित्य पूजेसाठी तलवारीची प्रतिकृती भेट दिली. शिवछत्रपतींच्या मूर्तीस कोल्हापूरकर छत्रपतींच्या वतीने जिरेटोप व पोशाख आजही दिला जातो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT