शिवानी बावकर 
Latest

Shivani Baokar : ‘दिसतीया भारी…नेसून साडी’; शिवानी बावकरचा नादखुळा लूक!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शितली अर्थातचं शिवानी बावकर हिचा ऑरेंज कलरच्या साडीतला लूक व्हायरल झाला आहे. गोल्डन गोटा पट्टी वर्क असलेली साडी आणि त्यावर शोभून दिसेल असे गुलाबी रंगाचे ब्लाऊज परिधान करून शितलीने फोटोशूट केला आहे. (Shivani Baokar) एका काचेच्या खिडकी जवळ उभारून मदमस्त स्माईल देत शिवानीचा कमालीचा लूक व्हायरल झाला आहे. कानात मोठे गोल्डन कलरचे झुमके, मोकळे केस आणि हातात ब्रायडल अंगठी असा तिचा लूक व्हायरल झालेला दिसत आहे. तीन फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. या फोटोजना तिने ..wonder how paths cross? अशी कॅप्शन लिहिलेली दिसते. (Shivani Baokar)

सध्या ती स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत दिसत आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT