पुढारी ऑनलाईन डेस्क : मविआमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी केलेले पाप एकनाथ शिंदेनी सर्व धूवून टाकले, अशी घणाघाती टीका सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. बीकेसी येथे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ते बाेलत हाेते.
महाराष्ट्रातील खरी शिवसेना कोणती आहे हे गर्दी पाहून तुम्हाला ठरवावे लागेल. बाळासाहेब ठाकरे पोतं कोणाला म्हणायचे? भाजपची साथ सोडून मविआमध्ये का गेलात असा सवाल करत शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केला. अडीच वर्षात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडलेच नाहीत, असा टाेलाही त्यांनी लगावला. 'काय ते बीकेसी, काय ते वातावरण, सगळं काही ओके', अशा शब्दांत आपल्या भाषणाचा शेवट करत त्यांनी गर्दीची उत्साह वाढवला.
हेही वाचा :