shilpa shetty 
Latest

Shilpa Shetty : …त्यावेळीही मी श्रीमंत होते? : शिल्पा शेट्टी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर 90 चे दशक गाजवले. आजही ती सौंदर्य आणि तंदुरुस्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. पती राज कुंद्रामुळे शिल्पाला नेटकर्‍यांनी चांगलेच ट्रोल केले होते. शिल्पाने कुंद्राबरोबर केवळ पैशासाठी लग्न केल्याची टीका करत तिला गोल्ड डिगरचा टॅग दिला गेला होता. आता शिल्पाने नेटकर्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत शिल्पा ( Shilpa Shetty ) म्हणाली की, मी राज कुंद्राशी लग्न केले त्यावेळी तो श्रीमंत तरुणांच्या यादीत 108 व्या स्थानावर होता. पण मला वाटते की, लोक शिल्पाला गुगल करायला विसरले. मी पण त्यावेळी श्रीमंत होते आणि आजही आणखी श्रीमंत आहे. मी आयकर, जीएसटी आणि अन्य करही वेळेत भरते. राज कुंद्रापेक्षा श्रीमंत व्यक्तींनीही मला लग्नासाठी विचारले होते. पण, माझ्यासाठी आयुष्यात केवळ पैसाच महत्त्वाची नाही. शिल्पाने 2009 मध्ये कुंद्राशी लग्नगाठ बांधली. तिला समिशा आणि विहान ही दोन मुले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT