बायबॅक ही इंडियन इक्विटी मार्केट आणि जगभरातील कंपन्यांची नियोजनबद्ध पद्धतीने आखलेली फायनान्शियल स्ट्रॅटेजी असते. शेअर बायबॅक काय असते आणि कंपन्या शेअर बायबॅक का करतात, त्याची प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
शेअर बायबॅक ही एक प्रकारची कॉर्पोरेट अॅक्शन आहे. यात एक कंपनी खुल्या बाजारातून किंवा विद्यमान शेअरधारकांकडून शेअर खरेदी करते. त्यानंतर हे शेअर निवृत्त केले जातात. त्यामुळे एकूण बॅलेन्स शेअरची संख्या कमी होते. भारतात शेअर बायबॅक ही कंपनी अधिनियम 2013 अणि सेबी अधिनियम 2018 नुसार प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
शेअर बायबॅक करण्याचे कारण
शेअरधारकांचे मूल्य वाढविण्यास प्रोत्साहन : कंपनीकडून शेअर बायबॅक करण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेअरधारकांची किंमत वाढवणे. शेअरची संख्या कमी केल्याने प्रत्येक शेअरचे मूल्य (इपीएस) वाढू शकते आणि त्यानुसार बॅलन्स शेअर अधिक मौल्यवान होतो.
जादा रकमेचा वापर : एखादी कंपनी अतिरिक्त भांडवल गोळा करते, तेव्हा त्या फंडला निष्क्रीय ठेवण्याऐवजी त्याचा कौशल्याने वापर करण्यासाठी शेअर बायबॅकचा पर्याय निवडू शकते.
कॅपिटल स्क्ट्रक्चर ऑप्टिमायजेशन : शेअर बायबॅकची प्रक्रिया ही कंपनीला इक्विटल कॅपिटल कमी करून कॅपिटल स्क्ट्रक्चरला ऑप्टिमाईज करण्याची परवानगी देते. त्यामुळे कर्ज आणि इक्विटी यांच्यात चांगले संतुलन राहते.
फायनान्शिअल स्ट्रेंथचे संकेत : शेअर कंपन्या नेहमीच गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना आपल्या आर्थिक स्थितीची माहिती देत असतात आणि त्यासाठी बायबॅकच्या ऑफरचा वापर करते. परिणामी, कंपनीवरचा विश्वास वाढण्यास हातभार लागतो. कंपनीची आर्थिक स्थिती बळकट आणि स्थिर आहे, अशी भावना वाढीस लागते.
कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता : कर्मचारी स्टॉक पर्यायी योजना (ईएसओपी)च्या रूपाने जारी केलेल्या शेअरंना बायबॅक करण्यासाठीदेखील कंपनी बाजारात ही ऑफर आणू शकते. यानुसार सध्याच्या शेअरधारकाची ओनरशिप बळकट करण्याची संधी मिळते.
शेअर बायबॅकची प्रक्रिया : बोर्डाची मंजुरी ही प्रक्रिया कंपनीच्या संचालक मंडळाच्या निर्देशानुसार केली जाते. यानुसार शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली जाते आणि त्यानुसार पुन्हा खरेदी करण्यात येणार्या शेअरची कमाल संख्या आणि कमाल बायबॅक मूल्य निश्चित केले जाते.
शेअरधारकांची परवानगी : कंपनीच्या एका सामान्य बैठकीत मंजूर केलेल्या विशेष प्रस्तावांच्या माध्यमातून बायबॅकला मंजुरी द्यावी लागते. त्यासाठी किमान 75 टक्के मतदान असणे गरजेचे आहे.
जाहीर घोषणा : शेअर पुन्हा खरेदी करण्यासाठी कंपनीला या योजनेची जाहीर घोषणा करावी लागते. त्यात बायबॅक किंमत, बायबॅक करण्यात येणार्या शेअरची संख्या आणि कालावधी यासारख्या विवरणाचा समावेश असतो.
खुल्या बाजारातून खरेदी : कंपनी खुल्या बाजारातून, स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून किंवा सध्याच्या शेअरधारकांकडून निविदा प्रस्तावांच्या माध्यमातून शेअर पुन्हा खरेदी करू शकते.
सेबीचे नियम : कंपनीला कमाल बायबॅक शेअरचा आकार, प्रायझिंग आण बायबॅक पूर्ण करण्यासाठीचा कमाल कालावधी यासंदर्भातील सेबीच्या नियमांचे पालन करावे लागेल.
एस्क्रो अकाऊंट : बायबॅक प्रोसेसला सुविधाजनक करण्यासाठी कंपनीला एक शेड्यूल कमर्शियल बँकेत एस्क्रो खाते सुरू करण्याची आणि हाताळण्याची गरज असते.
रिपोर्टिग : बायबॅक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी सेबी आणि स्टॉक एक्स्चेंज विविध अहवाल आणि स्पष्टीकरण सादर करते. म्हणजेच बायबॅकच्या प्रक्रियेची माहिती देणे बंधनकारक असते.