Latest

Shardul Thakur IPL 2023 : शार्दुल ठाकूरला KKR ने घेतले विकत, IPL लिलावापूर्वी दिल्लीने केले रिलीज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 चे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (shardul thakur) इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळताना दिसणार आहे. KKR ने त्याला पुढील हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून खरेदी केले आहे. पण याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.

अगामी आयपीएल (IPL) स्पर्धा सुरू होण्याआधीच आयपीएल संघांनी आपापल्या ताफ्यात नवे खेळाडू सामील करून घेण्याची तयारी सुरू केली आहे. या लीगसाठी आयपीएल लिलावही काही आठवड्यांनंतर आयोजित केला जाणार आहे. अनेक फ्रँचायझी काही खेळाडूंना आगामी हंगामासाठी कायम ठेवत आहेत तर काही खेळाडूंना खराब कामगिरीमुळे संघाबाहेरचा रस्ताही दाखवत आहेत. मुंबईनंतर (Mumbai Indians) दिल्ली फ्रँचायझीनेही (Delhi Capitals) काही खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली संघाचा ऑलराऊंडर शार्दिल ठाकूर (shardul thakur) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाताकडून (KKR) खेळताना दिसत आहे.

गेल्या वर्षी आयपीएलच्या (IPL) मेगा लिलावात शार्दुल ठाकूरवर (shardul thakur) जोरदार बोली लागली होती. दिल्ली कॅपिटल्सने मोठ्या संघर्षानंतर 10.75 कोटींची बोली लावून शार्दुलचा संघात समावेश केला होता. ठाकूरने गेल्या वर्षीच्या स्पर्धेत 14 सामन्यांत 15 विकेट घेतल्या होत्या, पण या दरम्यान त्याने त्याने 9.79 च्या इकॉनॉमीने धावाही खर्च केल्या होत्या. फलंदाजीत, तो 15.00 च्या सरासरीने केवळ 120 धावाच करू शकला.

ईएसपीएनच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या लिलावापूर्वी दिल्ली संघाने शार्दुल ठाकूरला (shardul thakur) रिलीज केल्याचे आहे. त्यानंतर लगेचच ठाकूरला KKR ने विकत घेल्याचे समजते आहे. त्यामुळे ट्रेड विंडो अंतर्गत कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाल्याने शार्दुलचा लिलावात सहभाग होणार नाही असल्याचे वृत्त समोर आले आहे.

याआधी केकेआर संघाने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज यांना गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून खरेदी केले होते. मेगा लिलावात गुजरातने फर्ग्युसनला 10 कोटी रुपयांना विकत घेतले आणि जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर गुरबाजचा संघात समावेश करण्यात आला होता.

IPL 2023 चा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या जाहीर झालेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत सोपवावी लागेल. KKR व्यतिरिक्त पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी व्यवहार केला आहे. बेहरेनडॉर्फला बंगळुरूने मेगा लिलावात 75 लाख रुपयांना विकत घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT