मुंबई; पुढारी ऑनलाईन : आपल्याकडे पुर्वी असे म्हटले जायचं की बापाच्या पावलावर मुलं जातात. तसे बरेचदा होतं देखील. डॉक्टरची मुलं डॉक्टर, वकीलांचे वकील, इंजिनिअरची मलं इंजिनिअर होताना आपण आजू बाजुला पाहतो. तशी मुलं आपल्या आई – वडिलांपेक्षा वेगळे करिअर देखिल निवडतात. सिनेसृष्टीत देखिल असेच आहे. अनेक अभिनेते व अभिनेत्रींच्या मुलामुलींनी त्यांच्याच क्षेत्रात करिअर्स केली आहेत. याची अनेक उदाहरणे देखील आहेत. पण, बऱ्याच अभिनेत्यांची अथवा सिने सृष्टीतील कलाकारांच्या मुलांनी वेगळे प्रोफेशन्स सुद्धा निवडले आहे. असेच काहीसे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe Emotional Post) यांच्या बाबतीत घडले आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीने पायलट व्हायचं ठरवलं आहे व ती यासाठी परदेशी शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला परदेशात जाताना पाहून शरद पोंक्षे यांच्यातील बाप मात्र भावूक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी परदेशात जाणाऱ्या पोरीला निरोप देत 'पिल्लू निघालं वैमानिक व्हायल' असे म्हणत एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्ट मधील बाप-लेकींना पाहून सारेजण भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe Emotional Post) एक हरहुन्नरी कलाकार म्हणून मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहेत. ते जसे एक अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच ते त्यांचे राजकीय, सामाजिक अशी परखड विचार व मते व्यक्त करण्यासाठी देखिल प्रसिद्ध आहेत. सहसा सिनेसृष्टीतील कलाकार राजकीय सामजिक भूमिका घेण्यासाठी घाबरतात. पण, शरद पोंक्षे हे ठामपणे आपली मते प्रकट करताना दिसतात. तसेच ते सोशल मीडियामध्य देखिल सक्रीय असतात. असा हा अभिनेता जसा आपल्या कामात चोख व शिस्तबद्ध आहे, तसाच तो आपल्या कुटुंबासाठी प्रेमळ व हळवा देखील आहे. त्याने नुकतेच मुलीच्या संदर्भात जी पोस्ट केली आहे त्यातून त्यांच्या कुटुंबवत्सलतेची झलक पाहण्यास मिळाली.
शरद पोंक्षे यांच्यावर २०१९ साली एक मोठे संकट ओढवले होते. त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. ते या रोगाशी लढत होते. तेव्हा त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मोठ्या संकटाच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागला. तेव्हा ते रुग्णालयात असताना त्यांच्या मुलीने त्यांची सेवा करत १२ वी मध्ये विज्ञान या शाखेतून ८७ टक्के गुण मिळवले. यावेळी या बापाने लेकीचे तोंड भरुन कौतुक केले. त्यावेळी त्यांनी सोशल माध्यमामध्ये पोस्ट करत लेकीसाठी म्हणाले, माझ्यावर कर्करोगाचे उपचार चालू असताना कॉलेज सांभाळत मला रुग्णालयात पहात येवढ्या टेंशनमधून तीने अभ्यास करत मोठे यश मिळवले. आजुबाजूला इतके वाईट घडत असताना, माझ्या बाबतीत सतत वाईट बातम्या येत असताना त्यातून स्वत:ला सावरुन माझ्या मुलीने जे यश संपादन केले ते अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.
शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी हिने जिद्दीने आपल्या स्वप्नास गवसनी घातली आहे. ती आता पुढील स्वप्न पुर्ण करण्यासाठी वैमानिकाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशी निघाली आहे. यावेळी मुंबईच्या विमानतळावर शरद पोंक्षे यांनी आपल्या लाडक्या मुलीला सिद्धीला निरोप दिला. यावेळी ते चांगलेच भावूक झाले. तेव्हा त्यांनी विमानतळावरील दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'पिल्लू निघालं वैमानिक व्हायला' अशी कॅप्शन दिली आहे. बापलेकीचे हे प्रेम पाहून सारे सिनेरसिक सुद्धा भावूक झाले आहेत.
शरद पोंक्षे यांना मुलगा स्नेहल आणि मुलगी सिद्धी अशी दोन मुले आहेत. मुलगी पुढील शिक्षणासाठी परेदशी गेली आहे. तर मुलगा वडिलांच्याच सिनेक्षेत्रात आपले नशीब आजमावतोय. त्याने नुकतेच धर्मवीर या चित्रपटाच्या दिग्दर्शन टीममध्ये भाग घेतला होता. तो सध्या दिग्दर्शनानचे धडे गिरवतो आहे. त्याला नृत्यांची विशेष आवड आहे व तो उत्तम डान्सर आहे. या जोरावर त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे.