नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमचे गुरु असल्याने त्यांचा फोटो आम्ही वापरणारच आहोत, अशी भूमिका अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपले फोटो वापरू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार यांचे फोटो वापरण्यावर अनेकजण कायम असल्याचे चित्र आहे.
यामुळे संभ्रमही कायम आहे. आपण गडचिरोलीत आगामी लोकसभा निवडणूक एनडीएच्या माध्यमातून लढणार, असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. सध्या भाजपकडे हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एनडीएत यावे, आम्हाला आशीर्वाद द्यावेत, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे.
दरम्यान, मुंबईत बांद्रा परिसरात एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात उंदीर निघाला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हॉटेल्सची तपासणी करण्याचे, प्रसंगी हॉटेलचा परवाना रद्द करण्याचे देखील आदेश देण्यात आल्याची माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
हेही वाचा