Latest

Sharad Pawar Resign : शरद पवारांच्या निवृत्तीबाबत सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांबद्दल शंका

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sharad Pawar Resign :लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. शरद पवार यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठा भूकंप मानला जात आहे. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय दडले आहे याचा सर्वांनीच शोध घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे काही नेते आणि अजित पवार यांची वेगळी भूमिका याकडे अनेक जण बोट दाखवत आहे. सामनाच्या अग्रलेखातही अजित पवार यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून शंका उपस्थित करण्यात आली आहे. Sharad Pawar Resign

शरद पवार यांना सामनातून राजकारणातील भीष्म म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी शरद पवार हे भीष्माप्रमाणे शरपंजरीवर पडलेले नाही, तर राजकीय नाट्यातील खरे सूत्रधार आपणच आहोत, हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. तसेच शरद पवार यांच्या निवृत्तीचा निर्णय हा त्यांच्या प्रकाशित आत्मचरित्राबाहेरी एक स्वतंत्र प्रकरण आहे, असेही त्यात म्हटले आहे. याचवेळी सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेतील आमदार फुटल्यानंतरच्या परिस्थितीचा संदर्भ राष्ट्रवादीच्या अंतर्गत परिस्थितीशी जुळवून शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा अर्थ जोडण्याचा देखील प्रयत्न केला आहे. Sharad Pawar Resign

अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर अनेक नेत्यांनी अश्रू ढाळले तसेच त्यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी आग्रह घेतला. असे असले तरी यापैकी अनेक नेत्यांचा एक पाय भाजपमध्ये आहे. तसेच अनेक नेत्यांनी ईडीचा धसका घेतल्याने ते भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे उद्याला राष्ट्रवादीतील आमदार भाजपमध्ये गेलेत तरी जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असे विश्लेषण सामनाच्या अग्रलेखात दिले आहे.

Sharad Pawar Resign : अजित पवार यांच्या भूमिकेवर शंका

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर एकीकडे अनेक जण अश्रू ढाळून त्यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी आग्रह धरत असताना अजित पवार यांनी उघडपणे वेगळी भूमिका घेत, पवार यांच्या निवृत्तीचे समर्थन केले तसेच शरद पवार आपला निर्णय मागे घेणार नाही, असे ठामपणे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या संमतीने नवीन अध्यक्ष निवडण्यात येईल असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. हा नवीन अध्यक्ष कोण? असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत शरद पवार यांच्यासारखा वकुब असलेला नेता निवडताना काळजी घ्यावी लागेल, असेही म्हटले आहे. एकूणच अजित पवार यांच्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून शंका घेण्यात आली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT