पुढारी ऑनलाइन डेस्क : Sharad Pawar on Ajit Pawar rebellion : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे 11 वे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तानाट्यातील या एकूणच घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणतात,
- "खरं तर पंतप्रधानांचे आभार. त्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हा भ्रष्ट पक्ष असल्याचं म्हटलं होतं पण आज त्यांच्यासोबत आमच्या पक्षातील काही नेते आहेत. त्यामुळे आपसूक आमचे नेते त्यांनी केलेल्या आरोपातून मुक्त झाले आहेत."
- "तिथे जाण्यापूर्वी मला काही नेत्यांचा फोन आला होता. त्यांना तिथे बोलावून सही करून घेतल्याचंही सांगितलं. पण त्यांनी सुरू असलेल्या घडामोडींशी त्यांची भूमिका वेगळी असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आतापेक्षा 2-3 दिवसांनी चित्र वेगळं असू शकतं."
- " 1980 मी ज्या पक्षात होतो त्यात एक वेळ अशी आली की केवळ 5 लोक राहिले. यानंतर मी बाहेर पडलो, भेटी घेतल्या, पक्षबांधणी केली.'
- "आजच्या घटनेनंतरही मला जनतेवर विश्वास. जनता या सगळ्या प्रकारात योग्य निर्णय घेईलच.
- " मी उद्या सकाळी कराडला जाणार आहे. तिथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेईन. त्यानंतर एक मेळाव्याला हजेरी लावेन. तेथूनच मी माझ्या संपर्क दौऱ्याला सुरुवात करेन.'
- 'अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचं मला माहिती नाही. तसेच पक्षाच्या नावाबाबत माझं कुणाशीही भांडण नाही. किंवा पक्षाचीही तशी भूमिका असणार नाही.
- सध्या संघटनेची बांधणी यांकडेच माझं पूर्ण लक्ष असणार आहे.
- या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. यातील काही नेमणुका मी केल्या आहेत. त्यानं काही जबाबदारीही दिली होती. त्यांनी ती पार पाडली नाही. पक्षात राहून पक्ष हिताची पावलं टाकली नाहीत.
- प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. पक्षाच्या चौकटी बाहेरील काम करण्याऱ्याबाबत नक्कीच निर्णय घेतला जाईल.
- माविआ एकत्रच. आज माझं इतर नेत्यांशी बोलणं झालं. आता पक्ष बांधणीसोबतच मविआ राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न.
राज ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन पवार यांना राष्ट्रवादीची टीम बी आहे का असं विचारलं असता, ' आधी शिल्लक असलेली टीम तर बघतो, असं मिश्किल उत्तर शरद पवार यांनी दिलं. अजित पवार यांनी हा निर्णय मुलगा पार्थ याच्या भवितव्यासाठी घेतला आहे का असा प्रश्न विचारला असता, तो कधीही वादाचा किंवा मतभेदाचा विषय नव्हता असंही शरद पवार म्हणाले."
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.