सांगोला; पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये सध्या हुकूमशाही चालू आहे सरकार विरुद्ध जे बोलतात त्यांना तुरुंगात टाकले जाते. गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत भाजप पुन्हा सत्तेवर आले. तर, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार नाहीत. देशात लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला हद्दपार केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
सांगोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भुषणराजे होळकर, माजी आमदार राम साळे, रामहरी रूपनर, उत्तम जानकर, शितलदेवी मोहिते-पाटील, बाबुराव गायकवाड, प्रा. पी .सी . झपके, डॉ बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, संभाजी शिंदे, सुरज बनसोडे आदी उपस्थित होते
यावेळी शरद पवार म्हणाले की, सांगोला तालुक्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे. त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने तालुक्यातील जनतेने जावे मागील दहा वर्षात लोकांना कोणते अच्छे दिन आले, कोणता विकास झाला असा सवाल करीत, मागील तिन वर्षात निवडणुका नाहीत. मोदीच्या हातातील सत्ता जाईल म्हणून निवडणुका नाहीत. झारखंड व दिल्लीचे मुख्यमंत्री चांगले काम करत होते त्यांच्यावर दबाव आणून त्यांना तुरुंगात टाकले. हे हुकूमशाही सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं. नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जाच्या व्याज दारात सवलत दिली. परंतु, कधी लोकशाही धोक्यात येऊ दिली नाही. परंतु मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावे असे सांगत फिरत आहेत. लोकशाही टिकविण्याचे आवाहन आपल्या सर्वांवर आहे. लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर, येत्या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना विजयी करावं.
यावेळी उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, पवार, मोहिते-पाटील व देशमुख कुटुंब हे एकत्र काम करत असून आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या हिताचीच कामे या कुटुंबांनी केली आहेत. विरोधक काय बोलतात याचे आम्हाला देणे घेणे नाही. पण, सोलापूर जिल्ह्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे.
यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख भूषण राजे-होळकर, बाबुराव गायकवाड सुरज बनसोडे, शरद कोळी, अनिकेत देशमुख, प्रा.पी. सी. झपके आदींनी आपले विचार मांडले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
हेही वाचा :