पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होतील. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या परिपत्रकानूसार शरद पवार यांना २ नोव्हें नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल. त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील. ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांनी निवेदनात म्हंटलं आहे की, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.