भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा नियोजन उपसमितीचे अध्यक्ष व खेड तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद आनंदराव बुट्टे पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी(मावळ विभाग) नियुक्ती झाली आहे.भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे याबाबतत घोषणा गुरुवारी (दि.१९) रोजी केली. बुट्टे पाटील यांच्या निवडीने खेड तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीचे जोरदार स्वागत केले.
बुट्टे पाटील हे खेड तालुक्यातील पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातून सलग २००२,२००७,२०१७ अशा तीन वेळा निवडून गेले आहेत.२०१२ च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी सुरेखा ठाकर यांना गटातून बिनविरोध निवडून आणण्याची किमया केली. त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसवर्धन विभागाचे सभापती व गटनेते म्हणून प्रभावी काम केले.जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळावी म्हणून जिल्हा नियोजन उपसमिती निर्माण करून त्या उपसमितीचे अध्यक्षपदी नियुक्त केल्याने रखडलेल्या कामांना गती आली.
विकासाभिमुख नेतृत्व म्हणून बुट्टे पाटील जिल्ह्यात ओळखले जातात. पुणे – मावळ विभागाचे जिल्हाध्यक्षपदी बुट्टे पाटील यांची निवड करून भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री संजयबाळा भेगडे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,जयसिंग एरंडे,गणेश भेगडे आदी भाजपचे पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्त्यांनी निवडीचे स्वागत केले.
हे ही वाचा :