पुढारी ऑनलाइन डेस्क : Shani Ghochar : प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. तसेच प्रत्येक राशीत शनीचे गोचर कधी ना कधी सुरू होते. शनीने मंगळवार दि.17 पासून वेगवेगळ्या राशींसोबत गोचर सुरू केले आहे. शनी आजपासून मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच काही राशींमध्ये साडेसाती सुरू झाली आहे. मात्र, सध्या सगळ्यात जास्त सावधान कुंभ राशीच्या व्यक्तींनी राहायला हवे कारण या राशीतील व्यक्तींसाठी शनिची दूसरी साडेसाती सुरू झाली आहे. तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी अंतिम साडेसाती सुरू झाली आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा पहिला टप्पा असणार आहे. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर अडीचकी सुरू होणार आहे.
शनीच्या साडेसातीचे व्यक्तींच्या जीवनातील विविध पैलूंवर परिणाम होतो. व्यवसाय, नोकरी, प्रेम, कौटुंबिक सूख, आरोग्य, शिक्षण या सर्व बाबींवर व्यक्ती आणि राशीपरत्वे वेगवेगळा बदल होईल. तर काही जणांना या साडेसातीत देखील लाभ होणार आहे.
कुंभ राशीत दुस-या टप्प्यातील साडेसाती सुरू होत असल्याने त्यांच्यासाठी शनीची साडेसाती सगळ्यात जास्त कष्टदायक ठरणार आहे, असे ज्योतिषांचे मत आहे. यामध्ये वारंवार तब्येत बिघडणे, महत्वाच्या कामात अडथळे येणे, कोर्ट-कचेरी प्रकरणे, मान-प्रतिष्ठेत वाढ, कामाद बदल, जोडीदारासोबत मतभेद असे परिणाम होऊ शकतात.
या राशीतील लोकांचे शत्रू वाढतील, स्थान बदल होतील, प्रवासात त्रास, स्वतःच्या स्वभावात कटुता वाढेल. मात्र त्याचवेळी या लोकांना संपत्तीच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसासायात प्रगती होऊ शकते, एखादी कायमस्वरूपी स्थायी संपत्ती मिळू शकते, असे भाकित करण्यात आले आहे.
या राशीतील लोकांना व्यवसायात त्रास होईल, कोटुंबिक कलहातून देखील जावे लागेल, आर्थिक परिणाम संभवतील, शारीरिक कष्ट वाढतील. तर मित्र आणि प्रेम यांच्याकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल.
कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नीलम हा रत्न फार लाभकारक आहे. यामुळे साडेसातीत देखील तुम्हाला लाभ मिळेल. हे रत्न धारण केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कामकाजातही वाढ होईल. या रत्नाला धारण केल्याने तुमच्या सर्व समस्या सुटतील. धनधान्यात वृद्धी होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी आपल्या मधल्या बोटात सोन्याच्या अंगठीत 4 रत्तीचा नीलम धारण करावा.
ज्योतिष शास्त्राच्या अनुसार, मकर राशीचे स्वामी देखील शनिदेव आहे. त्यामुळे या राशीतील लोकांनी देखील नीलमच धारण करायला हवा. मकर राशीतील व्यक्तींनी नीलम धारण केल्यास त्यांच्या कार्यशैलीत मोठ्या सुधारणा जाणवतील. त्यांची विचार करण्याची क्षमता तीव्र गतीने वाढेल. याशिवाय हे रत्नच तुम्हाला शनिची दृष्टी आणि साडेसाती कमी करण्यासाठी मदत करेल. शनिच्या साडेसातीपासून बचाव करण्यासाठी नीलम हे रत्न अत्यंत प्रभावशाली आहे.
हे ही वाचा :