hema malini and shahrukh khan  
Latest

Shahrukh : किंग खानने हेमा मालिनी यांना स्वत:च्या हाताने घातली होती चप्पल (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरूख खानची (Shahrukh) ओळख आहे. दमदार अभिनय आणि सुपरहिट चित्रपटामुळेच नव्हे तर आपल्या नम्र स्वभावामुळेही बॉलिवूडचा बादशाह शाहरूखने बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण  केलं आहे. तरीही शाहरूखचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. शाहरूखच्या आयुष्यात असाच एक प्रसंग घडला होता, ज्याचं खूप कौतुक झालं होतं.  एका ॲवॉर्ड शो कार्यक्रमादरम्यान शाहरूखने स्वत: हेमा मालिनी यांचे सँडल हातात घेत त्यांच्या पायात घातली होती. (Shahrukh )

ही घटना एका ॲवॉर्ड शोदरम्यान घडली होती. जेव्हा हेमा मालिनी यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. या शोदरम्यान हेमा मालिना यांचे नाव पुकारण्यात आल्यानंतर शाहरूख हेमाजींना आणण्यासाठी खाली उतरला. आदराने हेमाजींसोबत तो पायऱ्यांवरून स्टेजवर जात होता. यादरम्यान  हेमाजींचे सँडेल पायऱ्य़ांमध्ये अडकले होते. त्यावेळी शाहरूखने पटकन जाऊन ते सँडेल जिन्यातून काढले. तो ते सँडेल हेमा मालिनी यांच्या पायात घातले. त्यानंतर ते दोघेही स्टेजवर पोहचले. शाहरुखचा हा मोठेपणा पाहून या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे तोंड भरून कौतुक केले होते. या समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पठाणची क्रेझ

२५ जानेवारीला प्रदर्शित झालेला  शाहरूखचा पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. वादात अडकलेला पठाण चालेल की नाही अशी शंका होती. परंतु पठाणची क्रेझ पाच दिवस झाले तरी कमी झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT