Ayan Khan  
Latest

Aryan Khan : स्टारडममुळे शाहरुखच्या लाडल्याने नाकारली तब्बल १२० कोटींची ऑफर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख खानचा लाडला आर्यन खान आगामी वेब सीरीज 'स्टारडम'वरून चर्चेत आहे. 'स्टारडम' शी संबंधित नवे अपडेट समोर येत असताना सीरीजमध्ये शाहरुख खानचा कॅमियोची चर्चा होतेय. (Aryan Khan) आता रिपोर्टनुसार, 'स्टारडम' साठी आर्यन खानला एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडून १२० कोटींची रक्कम ऑफर करण्यात आली होती. पण स्टारकिड आर्यनने ही ऑफर नाकारली. (Aryan Khan)

अभिनेता म्हणून आर्यन खान डेब्यू करणार असल्याचे म्हटले जात होते. पण, आर्यनने स्पष्ट केलं की, त्याला अभिनयात फारशी रुची नाही. आर्यनने चित्रपट निर्माता बनण्याचं ठरवलं. शाहरुख खान आणि गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन वेब शोसोबत दिग्दर्शक म्हणून तयार आहे.

आर्यन खानने नाकारली १२० कोटींची डील

आर्यन खानला मीडिया आणि लाईमलाइटपासून दूर राहणं आवडतं. तो आपल्या प्रोजेक्टविषयी खूप उत्साहित आहे. आर्यनने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलं आहे की, स्क्रिप्ट शेअर केल्यानंतर तो आपला प्रवास सुरु करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.

रिपोर्टनुसार, आर्यन खान सध्या वेबसीरीजवर पूर्ण लक्ष केंद्रीत करत आहे. ती 'स्टारडम' पूर्ण केल्यानंतर या डीलवर विचार करेल. 'स्टारडम' मध्ये शाहरुखचा कॅमियो नसेल. शाहरुख 'जवान' सोबत 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT