Shah Rukh Khan-suhana khan  
Latest

Shahrukh Khan : ‘डॉन’ बनून एकटा नाही तर सुहाना खानला सोबत आणतोय शाहरुख

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार शाहरुख खानच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. शाहरुख खान अंडरवर्ल्ड किंग बनून पुन्हा येतोय. डॉन ३ फ्रेंचायझी सोडल्यानंतर तो नव्या चित्रपटात पुन्हा डॉन (विलेन) च्या भूमिकेत असेल, अशी माहिती समोर येत आहे. (Shahrukh Khan) 'डॉन ३' मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तो या आयकॉनिक चित्रपट कॅरेक्टरला एक मॉडर्न अंदाजात प्ले करताना दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, नव्या चित्रपटात शाहरुख त्याची कन्या सुहाना खानला या चित्रपटात घेऊन येतोय. (Shahrukh Khan)

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान पुन्हा एकदा डॉन बनून येत आहे. हा दुसरा प्रोजेक्ट असून सुहाना खानचीही महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे समजते. शाहरुख सोबत सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यासारखे दिग्दर्शक काम करत आहेत. एका सूत्रानुसार, 'सिद्धार्थ – सुजॉय सोबत शाहरुख स्वत: चित्रपटाच्या प्रत्येक सीनवर खूप मेहनत घेत आहे.'

ही देखील माहिती समोर आली आहे की, चित्रपटाचे टायटल 'किंग' यासाठी ठेवण्यात आले आहे की, शाहरुखची भूमिका 'अंडरवर्ल्डचा किंग' असेल. आधी असे सांगण्यात आले होते की, 'किंग'ला २०० कोटींच्या बजेटमध्ये एक दमदार ॲक्शन एंटरटेनर बनवलं जाईल.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख-सुहानाच्या या चित्रपटावर अनेक दिवसांपासून काम सुरु आहे. पण आतापर्यंत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. शूटींग या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू होईल. २०२५ मध्ये चित्रपट रिलीज करण्याचे नियोजन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT