नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील गोकलपुरी पोलिस ठाणे परिसरातील गोकलपुरी गावात शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत ३० झोपड्या भस्मसात झाल्या. या भीषण दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री एका झोपडीला आग लागली. काही क्षणात ३० हून अधिक झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे १३ बंब आले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० झोपड्या आगीत भस्मसात झाल्या.
हेही वाचलं का?