Latest

शेअर बाजारात पुन्हा मंदी, कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ६३१ अंकांनी घसरला

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आज सोमवारी शेअर बाजार खुला होताच त्यात घसरण दिसून आली. सकाळी बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स (Sensex) सुमारे ६३१ अंकांनी घसरला. निफ्टीही (Nifty) खाली आला. कमकुवत जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सकाळी बाजारात खुला होताच सेन्सेक्स ६३१ अंकांनी घसरून ५६,४२९ वर तर निफ्टी १७८ अंकांनी घसरून १६,९२४ वर आला. टॉप लुजर्समध्ये बजाज, इन्फोसिस, अशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक यांचा समावेश होता.

NSE वर उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) २९ एप्रिल रोजी ३,६४८.३० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,४९० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT