Latest

Sensex Opening Bell: आठवड्याची सुरुवात पडझडीने, सेंसेक्‍ससह निफ्‍टीतही घसरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेअर बाजाराची आज ( दि. २७ ) पडझडीनेच सुरुवात झाली. आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने नकारात्‍मक सुरुवात झाली आहे. आज १३२.६२ अंकांची घसरणीने सेन्‍सेक्‍सने ५९,३३१.३१ ने व्‍यवहाराला सुरुवात झाली. तर निफ्‍टीही ३७.२० अंकांच्‍या घसरणीने १७, ४२८.६० अंकावर सुरुवात झाली.

मागील आठवड्यात म्‍हणजे शुक्रवारी सेन्सेक्स १४१ अंकांनी घसरून ५९,४६३ वर बंद झाला. तर निफ्टी ४५ अंकांनी खाली येऊन १७,४६५ वर बंद झाला होता. शुक्रवारच्‍या व्यवहारात रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली. तर मेटल, ऑटो स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला होता. सेन्सेक्स घसरणीमुळे सलग सहाव्या सत्रात गुंतवणूकदारांना फटका बसला होता. मागील आठवड्यात सेन्‍सेक्‍समधील टॉप १० कंपन्‍यांमधील ९ कंपन्‍यांच्‍या शेअरमध्‍ये १,८७,८०८.२६ कोटी रुपये घसरण अनुभवास मिळाली होती.

फेब्रुवारी महिन्‍यात विदेशी गुंतवणुकीदारांचाी शेअर विक्रीचे सत्र सुरुच आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून २,३१३ कोटी रुपये काढून घेतली आहे. तर जानेवारी महिन्‍यात विदेशी गुंतवणूकदरांनी भारतीय शेअर बाजारातून २८ हजार ८५२ कोटी रुपये काढून घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT