Latest

बारामतीत येताच पोलीस अधिकारी भंजाळताहेत, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून महिलेला अश्लिल मेसेज

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामतीतीत आल्यावर पोलीस अधिकारी भंजाळताहेत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलेच्या संदर्भातील आणखी एका अधिकाऱ्याचे प्रकरण बाहेर आले आहे. गतवर्षी एका पोलिस अधिकाऱ्याने रासलिला करत खात्याच्या प्रतिमेला डाग लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅप अश्लिल संदेश पाठवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

या अधिकाऱ्यानी एका महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज टाकून तिला 'आय लव्ह यू' म्हणाल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे असून याबाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या पूर्वीही बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी करण्यात आली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. विधानसभा, विधानपरिषदेत तो विषय गेला होता. परंतु त्यावेळीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित मुलीलाच खोटे ठरवत यासंबंधी कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. अखेर या अधिकाऱ्याला पाठीशी घालणे म्हणजे आपला बळी जाणे, हे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ त्याची बदली केली होती. परंतु बारामतीत त्या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.

त्या पाठोपाठ पुन्हा एका अधिकाऱ्याने पती-पत्नीच्या तक्रारीसाठी आलेल्या महिलेला एमपीएससी परीक्षेसाठी सर्व ते मार्गदर्शन आणि मदत करतो असे सांगत, तिची पुण्यात राहण्याची व्यवस्था केली होती. तिला स्वतःच्या मुलाबाळांपासून तोडण्यात आले होते. तिच्या पतीलाही दमदाटी करण्यात आली होती. आता हे तिसरे प्रकरण बारामतीत चर्चेत आले आहे. पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यासंबंधी अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी, उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT