Latest

Sehwag on Virat’s Captaincy : विराटच्या कॅप्टनसीवरून सेहवागचे धक्कादायक विधान, म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 15 व्या हंगामात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB)ने चमकदार कामगिरी केली आहे. मुंबईने त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीचा पराभव केल्याने आरसीबी आपसूकच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आज (दि. 25) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सामना लखनौशी आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अशातच भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आरसीबीच्या प्रदर्शनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Sehwag on Virat's Captaincy)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार विराट कोहलीने या हंगामापूर्वीच कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आरसीबीने फाफ डू प्लेसिसला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघाने चमकदार कामगिरी केली आहे. डू प्लेसिसनेही खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीवर अखेरपर्यंत विश्वास दाखवत त्याला नेहमीच प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. (Sehwag on Virat's Captaincy)

सेहवाग म्हणाला की, संजय बांगर यांनी मुख्य प्रशिक्षक आणि फाफ डू प्लेसिसने कर्णधारपद स्वीकारल्यापासून आरसीबीच्या संघात खूप बदल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात हे काही दिसले नाही. डू प्लेसिसने खेळाडूंचा चांगला वापर करून घेतला. मात्र, विराट कोहली त्यात कमी पडला. तो कर्णधार असताना जर कोणत्या खेळाडूने खराब प्रदर्शन केले तर त्याला एक-दोन सामन्यानंतर कट्ट्यावर बसवलं जायचं, असे परखड मत त्याने मांडले. सेहवागने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्याचे निरिक्षण नोंदवले. (Sehwag on Virat's Captaincy)

मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि नव्या कॅप्टनच्या आगमनाने आरसीबीची विचारसरणी बदलली आहे. विराट कोहली कसा विचार करायचा हे आपण पाहिले आहे. कारण, 2-3 सामन्यांमध्ये कामगिरी न केल्यावर तो खेळाडूला डावलायचा. पण, बांगर आणि डु प्लेसिसने संघाला जवळपास स्थिर ठेवले आहे. अनुज रावतच्या जागेसाठी पाटीदार वगळता, इतर कोणताही बदल दोघांनी केलेला नाही. (Sehwag on Virat's Captaincy)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या कॅप्टनसीने खूप प्रभावित केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने शानदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान पटकावले. आरसीबी त्यांच्या 14 लीग-स्टेज सामन्यांपैकी 8 जिंकण्यात यशस्वी झाले. खराब नेट रन रेटमुळे त्यांना प्लेऑफमध्ये जाणे अवघड होते. पण मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीला हरवून बंगळूरचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. फाफ डू प्लेसिसने आरसीबीसाठी आयपीएलचे जेतेपद पटकावल्यास चाहत्यांसाठी ते स्वप्नापेक्षा कमी नसेल. कारण चाहत्यांना आरसीबीच्या पहिलेवहिले विजेतेपद जिंकताना पाहायचे आहे.

वीरेंद्र सेहवागने फाफच्या कॅप्टनसीवरून मोठी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'जर एखादा भारतीय खेळाडू कर्णधार असेल आणि विराट कोहलीने त्याला काही सल्ला दिला असेल तर तो दबावाखाली स्वीकारावा लागेल. डु प्लेसिस कर्णधार झाल्यावर हे सर्व बदलले. संजय बांगर यांनीही कोहलीसोबत काम केले आहे आणि ते त्याच्याशी याबद्दल बोलू शकतात.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT