सीमा हैदर 
Latest

Seema Haider : सीमा हैदरला मिळाली चित्रपटाची ऑफर, ‘या’ खास भूमिकेत दिसणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या चार मुलांना सोबत घेऊन भारतात आलेल्या सीमा हैदरची कहाणी सर्वश्रृत आहे. आता सीमा हैदर हिच्यावर चित्रपट आणण्याची जोरदार तयारी सुरु आहे. चित्रपटाची कहाणी ते तिच्या भूमिकेपर्यंत सर्व माहिती समोर आलीय. (Seema Haider) असे म्हटले जात आहे की, पाकिस्तानची राहणारी सीमा हैदर या चित्रपटा RAW एजेंटच्या भूमिकेत असेल. चित्रटाचे नाव असेल-A Tailor Murder Story. आणि ही राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या हत्येवर आधारित असेल. (Seema Haider)

इतकचं नाही तर असेही वृत्त समोर आले आहे की, सीमाचे ऑडिशनदेखील घेतले जात आहे. ज्याचे दिग्दर्शन जयंत सिन्हा आणि भारत सिंह करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे प्रोडक्शन jani Firefox हाऊस बॅनर अंतर्गत केले जाईल. निर्माता अमित जानी यांनी बुधवारी सीमा हैदरची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली.

जुलैमध्ये दोघेही अटकेत आता जामीनावर

सीमा पाकिस्तानातून आलीय आहे, तर ती एखाद्या गुप्तचर एजन्सीद्वारा तर भारतात आलेली नाही ना? याचा तपास तरण्यात आला. दोघांना अटक करून एटीएसने अनेकदा चौकशी देखील करण्यात आली. गुप्तचर एजन्सीद्वारा माहिती मिळाली की, सीमा हैदरचे काका पाकिस्तानी सैन्यात सुभेदार पदावर आहेत आणि तिचा भाऊदेखील पाकिस्तानी सैन्यात आहे. आता दोघेही जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत.

क्लीनचिट मिळण्याची प्रतीक्षा?

सीमा हैदर-सचिन यांचे स्टेटमेंट समोर आले होते की, त्या दोघांच्या विरोधात तपास सुरु आहे. आता त्यांना कुठलेही काम मिळत नाही. त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं आहे. दोघांची स्थिती ऐकल्यानंतप निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर दिली. अद्याप ही माहिती समोर आलेली नाही की, सीमाने चित्रपट करण्यास होकार दिला आहे की नाही? रिपोर्टनुसार, एटीएसकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर ती ही ऑफर स्वीकारेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT