पुढारी ऑनलाईन डेस्क : एसडीएम ज्योती मौर्य हे नाव सध्य़ा मोठे चर्चेच आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य यांच्याविषयी अनेक अपडेट्स समोर येत आहेत. पती-पत्नी यांच्यातील नाते आधी प्रेम, लग्न नंतर द्वेष आणि वाद अशा टप्प्यांवर येऊन पोहोचले आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी झाल्यानंतर खरचं ज्योती मौर्य यांनी स्वच्छता कामगार असणाऱ्या आपल्या पतीला सोडून दिलं? ज्योती मौर्य – आलोकचे प्रकरण काय आहे जाणून घेऊया? (SDM Jyoti Maurya)
पीसीएस अधिकारी ज्योती आणि तिचा पती आलोक यांचे लग्न झाल्यानंतर २०२२ पर्यंत नातं टिकलं. पण, २०२३ च्या सुरुवातीपासून संबंध बिघडू लागले. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप करणे सुरु केले. पुढे ही एक पोलिस केस बनली.
एसडीएम ज्योती मौर्य उत्तर प्रदेशातील बनारस जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. ज्योती मौर्य यांचे वडील गिरणी चालवतात. २०१० मध्ये ज्योती मौर्य यांचे लग्न आलोक मौर्यसोबत झाले. त्यावेळी त्या पदवीचे शिक्षण घेत होत्या. लग्नानंतर ज्योती यांनी पदवी पूर्ण केली. त्या शिक्षणात हुशार होत्या. ज्योती यांची आवड पाहून आलोकने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
ज्योती यांचे पती आलोक मौर्य प्रयागराजचे राहणारे आहेत. आलोक मौर्यने आपले शिक्षण प्रयागराजमध्ये पूर्ण केलं. पदवीनंतर परीक्षेची तयारीदेखील केली. दरम्यान, पंचायती राज विभागात स्वच्छता कर्मचारी म्हणून त्याला नोकरी मिळाली. पोलिसमध्ये निवड झाली. परंतु, काही कारणांमुळे त्याने हे पद स्वीकारलं नाही. सध्या आलोक प्रतापगढ जिल्ह्यातील पंचायती राज विभागात कार्यरत आहे.
ज्योती मौर्यने सासरी राहून पदवी पूर्ण केली. त्यांचे पती आलोक मौर्यने त्यांना प्रयागराज येथे UPPCS कोचिंगसाठी पाठवले. ज्योती यांनी कठोर परिश्रम केले. २०१५ मध्ये त्यांची पीसीएसमध्ये निवड झाली. २०१५ च्या पीसीएस परीक्षेत ज्योती यांनी १६ वा क्रमांक मिळवला होता. ज्योती यांची निवड झाल्यावर त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सासरे आणि पतीला दिले.
ज्योती मौर्य म्हणाल्या की, मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आता पतीपासून घटस्फोट हवा आहे. न्यायालयाचा जो आदेश असेल, तो वैध असेल. ज्योती यांनी सांगितले की, पती आलोकने १३ वर्षांपूर्वी खोटे बोलून लग्न केले होते की, तो अधिकारी आहे. मात्र आता तो सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्योती पीसीएस अधिकारी झाल्यानंतर कौशांबी, जौनपूर, प्रयागराज, प्रतापगढ आणि लखनऊमध्ये तैनात होत्या. सध्या त्या बरेलीच्या साखर कारखान्यात जीएम पदावर आहेत. ज्योती यांच्या लग्नानंतर दोन जुळ्या मुली झाल्या. त्या सध्या ज्योतीसोबत राहत आहेत.
जेव्हा नात्यात दुरावा निर्माण झाला तेव्हा ज्योती यांचे पती आलोक मौर्य यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले. आलोकने सांगितले की, अधिकारी झाल्यानंतर ज्योती यांची एका पीसीएस अधिकारीशी मैत्री झाली. त्याचेही लग्न झाले आहे. (SDM Jyoti Maurya)