State Bank of India 
Latest

एसबीआयची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक, जळगावच्या तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा

गणेश सोनवणे

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाची ३५२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जळगाव येथील तीन कंपन्यांविरुद्ध सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एसबीआयने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीनुसार, राजमल लखीचंद ज्वेलर्समुळे बँकेचा २०६.७३ कोटी, आरएल गोल्डमुळे ६९.१९ कोटी आणि मनराज ज्वेलर्समुळे ७६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले आहे. तीन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये एजन्सीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स यांचे नाव घेतले आहे. या कंपन्यांचे प्रवर्तक/ संचालक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन, पुषादेवी ईश्वरलाल जैन आणि नीतिका मनीष जैन यांना आरोपी करण्यात आले आहे.

एसबीआयच्या तक्रारीत काय म्हटलंय ?

राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स या कंपन्यांपैकी सर्वाधिक कर्जदार कंपनी राजमल लखीचंदमध्ये उर्वरित तीन कंपन्यांनी आपला व्यवसाय हस्तांतरित केला. चारही कंपन्यांची खरेदी-विक्री प्रामुख्याने राजमल लखीचंद यांच्या माध्यमातून मार्गी लावली, असा आरोप एसबीआयने केला आहे. एफआयआर दाखल केलेल्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये राजमल लखीचंद प्रा. लि.कडून खरेदी केल्याबद्दल पेमेंट केल्याचे दिसते, असेही एसबीआयने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रवर्तक, जामीनदार बँकेची परवानगी न घेता गहाण ठेवलेल्या मालमत्ता विकण्याच्या मर्यादेपर्यंत गेले आहेत. त्यामुळे आधीच घेतलेल्या मोठ्या कर्जाची सुरक्षा हमी धोक्यात आली. त्याचा गंभीर फटका बँकेच्या कर्जवसुलीला बसला,' असे एसबीआयने तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT