वरकुटे-मलवडी : पुढारी वृत्तसेवा
म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी, ता. माण येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास झाला आहे.
बापू बाबा पुकळे यांचा अपघातात मृत झाला. तर रोशन उत्तम पुकळे (दोघे रा. पुकळेवाडी, ता. माण) हे जखमी झाले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी सकाळच्या सुमारास बापू पुकळे व रोशन पुकळे हे दुचाकीवरुन विरकरवाडीहून पुकळेवाडीकडे निघाले होते. दरम्यान, कार चालक सुमित बाळासाहेब पाटोळे (रा. भैरवनाथ पार्क कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे मायणीहून म्हसवडच्या दिशेने येत होते. दिडवाघवाडी येथे त्यांची कार (क्र. एमएच 05, सीए 1718) व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसली. या अपघातात बापू पुकळे यांचा जागीच मृत्यू झाला तर रोशन पुकळे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलिस ठाण्यात प्रविण मच्छिंद्र हुबाले यांनी दिली असून म्हसवड पोलिस तपास करत आहेत.