न्यूयॉर्क : सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्डचा मुकुट जिंकला आहे. जगभरातील 63 देशांच्या महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तब्बल 21 वर्षांनी हा बहुमान भारताच्या वाट्याला आला आहे.
याआधी 2001 मध्ये भारताच्या डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी हा मुकुट जिंकला होता. सरगम कौशल (32) या जम्मू-काश्मीरच्या असून इंग्रजी साहित्यातील पदवीधर आहेत. त्यांचे पती नौसेनेत आहेत. सरगम यांनी विशाखापट्टणमध्ये शिक्षिका म्हणून काम केलेले आहे.