मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यातील नात्याचा अजून अधिकृतपणे खुलासा झालेला नसला, तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे याबद्दलच्या चर्चेला खतपाणी घातले जात आहे. या व्हिडीओत शुभमनची बहीण शहनील गिल ही सारासोबत कारमधून भटकंती करताना दिसत आहे. दोघींची भेट कॅमेर्यात कैद झाली आहे.
यात सारा काळ्या रंगाच्या कटआऊट ड्रेसमध्ये, तर शहनील हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र, दोघीही कॅमेर्यांचे फ्लॅश चेहर्यावर पडताच दोघीही अस्वस्थ दिसल्या. साराने चेहरा लपवला, तर शहनीलने चेहर्यावर मास्क चढवला. दोघींनीही कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
सारा आणि शुभमन यांच्या अफेरच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. पण ही नेमकी सारा कोण याचा नेटकऱ्यांना लागत नव्हता. त्यामुळे शुभमन गिलसोबत सारा अली खान आणि सारा तेंडूलकर या दोघींच्या नावाच्या चर्चा होत हाेती. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हीने कॉफी विथ करण या शोमध्ये याबाबत खुलासा केला. आता सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलची बहिण एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.